राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स बजावण्यात आल्यानंतर अखेर ते आज (मंगळवार) ईडी समोर चौकशीसाठी हजर झाले होते. ईडीकडून त्यांची जवळपास आठ तास चौकशी करण्यात आली. यानंतर जेव्हा अनिल परब ईडी कार्यलायच्या बाहेर आले, तेव्हा माध्यमांन त्यांना गरडा घातला व चौकशीबाबत विचारणा केली. यावर त्यांनी माध्यमांना उत्तरही दिले.

“मला ईडीचं जे समन्स आलं होतं. त्यानुसार आज मी ईडीच्या अधिकाऱ्यांसमोर जाऊन, त्यांनी जे प्रश्न विचारले त्या सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहेत . ईडी ही एक ऑथॅरिटी आहे आणि ऑथॅरिटीला उत्तर देणं ही माझी जबाबदारी आहे. कुणा एकास वैयक्तिक उत्तर देणं ही माझी जबाबदारी नाही. म्हणून ज्या ऑथॅरिटीने मला प्रश्न विचारले. त्या ऑथॅरिटीला मी आज उत्तर दिलेलं आहे. भविष्यातही मी सहकार्य करणार आहे. कारण, मला प्रश्न विचारण्याचा अधिकार ऑथॅरिटीला आहे. कोणा वैयक्तिक माणसाला नाही. ऑथॅरिटी जे प्रश्न विचारेल त्याला मी उत्तर देईन.” असे अनिल परब यांनी सांगितले.

दरम्यान, दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत, चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असं देखील परब आच चौकशीला जाण्या अगोदर म्हणाले होते. अनिल परब यांना काही दिवसांपूर्वी दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. पहिल्या समन्सनंतर देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. मात्र, दुसऱ्या समन्समध्ये त्यांना मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी अर्थात आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनिल परब चौकशीसाठी आज हजर झाले होते.
अनिल परब यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गंभीर आरोप ठेवले आहेत. तसेच, दापोलीमधील त्यांच्या रिसॉर्टमध्ये देखील अनिल परब यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे.

१०० कोटी वसुली प्रकण –

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले आहे. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या जबाबात देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात पोलिसांच्या बदल्यांसाठी २० कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप वाझेंनी केला होता. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात ते आरोप होते. तळोजा कारागृहात जाऊन ईडीच्या तुटवडा टाळण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहनअधिकाऱ्यांनी सचिन वाझेंचा ईडीने जबाब नोंदवला होता. यापूर्वी परब यांना ३१ ऑगस्टला ईडीने समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्या वेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.