अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, “ईडीनं मला का बोलावलं आहे हे…”

अनिल परब यांना याआधीही समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र, तेव्हा ते हजर होऊ शकले नव्हते.

अनिल परब चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर; म्हणाले, “ईडीनं मला का बोलावलं आहे हे…”
संग्रहित

आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी दोनदा समन्स बजावल्यानंतर अखेर राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी ईडीसमोर चौकशीसाठी हजर राहण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्यांनी स्वत: माध्यमांना माहिती दिली आहे. दरम्यान, दोन समन्स बजावण्यात आले असून अद्याप त्यांनी मला चौकशीसाठी का बोलावलं आहे, हे मला माहिती नाही असं सांगत चौकशीत माझी पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका असेल, असं देखील ते म्हणाले. अनिल परब यांना काही दिवसांपूर्वी दुसरं समन्स बजावण्यात आलं होतं. पहिल्या समन्सनंतर देखील ते चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. मात्र, दुसऱ्या समन्समध्ये त्यांना मंगळवारी २८ सप्टेंबर रोजी अर्थात आज चौकशीसाठी हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार अनिल परब चौकशीसाठी आज हजर होत आहेत.

बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन…

“मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. मी शिवसेना प्रमुखांची आणि माझ्या मुलींची शपथ घेऊन सांगितलं आहे की मी कोणत्याही प्रकारचं चुकीचं काम केलेलं नाही. चौकशीत मला जे प्रश्न विचारले जातील, त्याची उत्तरं दिली जातील. मला अजूनही चौकशीसाठी का बोलावलं आहे हे मला माहिती नाही. पण चौकशीमध्ये पूर्ण सहकार्य ठेवण्याची माझी भूमिका असेल”, असं ते म्हणाले.

१०० कोटी वसुली प्रकण

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या १०० कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आले आहे. त्याप्रकरणी अटक करण्यात आलेला बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेंच्या जबाबात देशमुख यांच्यासह अनिल परब यांच्यावरही भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यात पोलिसांच्या बदल्यांसाठी २० कोटी रुपये घेण्यात आल्याचा आरोप वाझेंनी केला होता. उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात ते आरोप होते. तळोजा कारागृहात जाऊन ईडीच्या तुटवडा टाळण्यासाठी रक्तदान करण्याचे आवाहनअधिकाऱ्यांनी सचिन वाझेंचा ईडीने जबाब नोंदवला होता. यापूर्वी परब यांना ३१ ऑगस्टला ईडीने समन्स पाठवण्यात आले होते. मात्र त्या वेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचे कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती.

किरीट सोमय्यांचे आरोप

अनिल परब यांच्यावर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी गंभीर आरोप ठेवले आहेत. तसेच, दापोलीमधील त्यांच्या रिसॉर्टमध्ये देखील अनिल परब यांनी गैरव्यवहार केल्याचा ठपका किरीट सोमय्या यांनी ठेवला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anil parab to go to ed for inquiry in money laundering case pmw

Next Story
ED कडून मोठी कारवाई; भावना गवळींच्या अडचणी वाढल्या, चौकशी होण्याचीही शक्यता
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी