सोलापूर : यंदा दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अन्य जिल्हयात कडबा विक्रीला बंदी घातल्याने मंगळवेढा शिवारात हजारो कडब्यांच्या पेंढ्यांचे ढिगारे जैसे थे स्थितीत असून अवकाळी पडलेल्या पावसामुळे या कडब्याचे नुकसान झाले आहे. रंग बदलल्याने कडब्याची प्रत घसरल्याच्या शेतकर्‍यांच्या तक्रारी असून महसूल विभागाने या कडब्याचे पंचनामे करुन नुकसान भरपाई द्यावी, अशी शेतकरी वर्गातून मागणी होत आहे.

हेही वाचा >>> मोहोळ तालुक्यात संजय क्षीरसागरांच्या रूपाने पोकळी भरून काढण्याचा शरद पवारांचा प्रयत्न 

thane, mumbra hill, Five Children lost on Mumbra Hill, Five Children Safely Rescued from Mumbra Hills, children Getting Lost for Seven Hours on Mumbra Hill, mumbra news, thane news,
मुंब्य्राच्या डोंगरात पाच मुले वाट चुकली, मदत यंत्रणांनी शोध घेऊन केली सुटका
Nagpur, money, treatment,
पत्नीला कॅन्सर…हजार रुपयांच्या इंजेक्शनसाठी आठवडाभर संघर्ष….विवश दाम्पत्याने अखेर…..
trouble of thieves in the palanquin ceremony
पुणे : पालखी सोहळ्यात चोरट्यांचा उच्छाद
price, vegetables, leafy vegetables,
गृहिणींना दिलासा… पालेभाज्यांच्या दरात किती घट झाली?
Raju Shetty warning to sugar millers on overdue installments Kolhapur
…तर साखर कारखानदारांना उसाच्या बुडक्याने ठोकून काढू; राजू शेट्टी यांचा इशारा
naxalite, Gadchiroli, villages,
गडचिरोलीत नक्षलवाद्यांची चहूबाजूंनी कोंडी; आणखी पाच गावांनी केली प्रवेशबंदी
Jail, prisoners, agriculture,
कारागृहातील कैद्यांनी फुलवली कोट्यवधीची शेती, तब्बल साडेचार कोटींचे उत्पादन
91 lakhs by attracting high profits from investments in the market solhapur
बाजारात गुंतवणुकीतून जास्त नफ्याची भुरळ पाडून ९१ लाखांस गंडा; अकलूजमध्ये दोघा भावांचा प्रताप

मंगळवेढा शिवार राज्यात ज्वारीचे कोठार म्हणून ओळखले जाते. मागील वर्षी पाऊस कमी झाल्याने जमिनीतील तुटपुंज्या ओलीवर शेतकर्‍यांनी महागडी बियाणे, खते घेवून ज्वारीची पेरणी केली होती. तद्नंतर पडलेल्या रिमझीम पावसावर ज्वारीचा शिवार ऐन दुष्काळातही डोलू लागल्याचे चित्र होते. पीक पेरणी अणि काढणीसाठी झालेल्या खर्चाचा आर्थिक ताळमेळ साधून सुगीमध्ये कडबा व ज्वारी विकून संसाराचा गाडा चालविला जातो. यंदा दुष्काळी स्थितीमुळे जनावरांच्या चार्‍याचा प्रश्न गंभीर होवू नये म्हणून जिल्हा महसूल प्रशासनाने अन्य जिल्ह्यात चारा विक्री करण्यास बंदी घातल्यामुळे काळ्या शिवारातील पालेदार व चवदार कडबा जागेवर पडून राहिला. शिवारात जिकडे पाहावे तिकडे चौफेर जागोजागी कडब्याचे ढिगारे पडल्याचे चित्र आहे. मात्र मागील दोन आठवड्यांपासून अधुनमधून अवकाळी पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे पांढराशुभ्र चमकदार असणारा कडबा पावसात भिजून त्याचा रंग बदलून तो काळा पडला आहे. हा खराब झालेला कडबा  जनावरे खाण्यास धजत नाहीत. परिणामी, कडब्याची प्रत घसरल्याने दरही पडल्याचे शेतकर्‍यांचे म्हणणे  आहे.

शेतक-यांना आर्थिक फटका

अन्य जिल्ह्यात कडबा विक्री करण्यास बंदी घातल्याने मंगळवेढा शिवारात कडबा घेण्यास कोणताही व्यापारी येण्यास तयार नाही. त्यामुळे पडून असलेला कडबा अवकाळी पावसाने भिजून त्याची प्रत खालावली आहे. याचा आर्थिक फटका शेतकर्‍यांना बसला असून प्रशासनाने या कडब्याचे पंचनामे करुन शेतकर्‍यांना नुकसान भरपाई द्यावी. –दत्तात्रय बेदरे शेतकरी, बठाण