Anjali Damania on Santosh Deshmukh Murder Case : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणावर सातत्याने भाष्य करत आहेत. या प्रकरणातील आरोपी, त्यांना पाठिशी घालणारी व्यवस्था व नेत्यांवर टीका करत आहेत. आता त्यांनी या प्रकरणी पोलिसांनी दाखल केलेल्या गुन्ह्याची प्रत (पोलीस चार्जशीट रिपोर्ट) वाचून काही मुद्द्यांकडे लोकांचं लक्ष वेधलं आहे. त्या म्हणाल्या, “संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा जो तपास चालू आहे, त्यातील एका गंभीर मुद्द्याकडे मला सर्वांचं लक्ष वळवायचं आहे. सीआयडीचा तपास व एसआयटीकडून चाललेली चौकशी ही संतोष देसमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी चालू होती. केवळ खंडणीचा आरोपी शोधण्यासाठी हा तपास हाती घेतला नव्हता. असं असूनही नेमक्या कोणत्या गुन्ह्यांखाली वाल्मिक कराडला अटक केली? त्याला खंडणीप्रकरणात अटक करण्यात आली आहे. सीआयडीकडे खंडणी प्रकरणाचा तपास सोपवण्यात आला होता का?

दमानिया म्हणाल्या, “मी संतोष देशमुख हत्या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याची प्रत (पोलीस चार्जशीट रिपोर्ट) वाचली आहे. त्यामध्ये एका फोनकॉलची माहिती नमूद करण्यात आली आहे. त्यात वाल्मिक कराडचं संभाषण टिपण्यात आलं आहे. यामध्ये कराड आवादाच्या अधिकाऱ्याला धमकावत आहे”.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

हे ही वाचा >> “जागावाटपाच्या घोळामुळे महाविकास आघाडी पराभूत”, ‘त्या’ दोन नेत्यांकडे बोट दाखवत विजय वडेट्टीवारांचं वक्तव्य

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

अंजली दमानिया म्हणाल्या, “फोनवर एक व्यक्ती आवादाच्या अधिकाऱ्याशी बोलली. ती व्यक्ती आवादाच्या अधिकाऱ्याला म्हणते की दोन कोटी रुपये द्या अन्यथा बीड जिल्ह्यात तुमचं कोणतंही काम चालू देणार नाही. त्यानंतर आवादाच्या एका अधिकाऱ्याचं अपहरण झालं. या अधिकाऱ्याने त्याच्या तक्रारीत म्हटलं आहे की २८ मे २०२४ रोजी सकाळी ११ वाजता या खंडणीच्या कारणावरून माझं अपहरण झालं. आवादाच्या कर्मचाऱ्याने इतका गंभीर आरोप केला होता. त्याचं अपहरण झालं होतं तरी देखील त्यावेळी त्या प्रकरणातील आरोपींवर कारवाई झाली नाही. त्यावेळी पोलिसांनी कारवाई केली असती तर संतोष देशमुखांचे प्राण गेले नसते. ही दिरंगाई कोणामुळे झाली? का झाली? पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही कारवाई झाली नाही. त्या अधिकाऱ्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत”.

हे ही वाचा >> “जमत नसेल तर स्पष्ट सांगा”, पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवरून अजित पवारांचा पोलिसांवर संताप; गृहमंत्री फडणवीस म्हणाले…

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या, “मे महिन्यात तक्रार आली होती तर तेव्हाच पोलिसांनी योग्य कारवाई करायला हवी होती. त्यांचं आरोपींशी संगनमत होतं की त्यांच्यावर राजकीय दबाव होता हे स्पष्ट झालं पाहिजे. खंडणी वेगळी आणि हा गुन्हा वेगळा आहे. खंडणीची मागणी मे महिन्यापासून होती. त्याचदरम्यान, अधिकाऱ्याचं अपहरण झालं. सुदर्शन घुले, चाटे व इतर माणसं यामध्ये होती. फक्त वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून हे गुन्हे झाले आहेत यात शंका नाही”.

Story img Loader