अभिनेत्री उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. उर्फी जावेद परिधान करत असलेल्या तोकड्या कपड्यांवरून तिच्यावर कारवाई करण्याची मागणी चित्रा वाघ यांनी मुंबई पोलिसांकडे केली आहे. दरम्यान, या वादात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही उडी घेतली आहे. अंजली दमानिया यांनी भाजपाच्या जनआक्रोश महासभेतील एक व्हिडीओ रिट्वीट करत ही कोणती संस्कृती आहे? असा प्रश्न चित्रा वाघ यांना विचारला आहे.

हेही वाचा – “राजवस्त्र काढा, मग दाखवतो,” संजय राऊतांचे नारायण राणेंना जशास तसे उत्तर; म्हणाले “माझ्या नादाला लागू नका अन्यथा…”

freedom of artist marathi news
‘कलानंद’ हवा असेल तर ‘कलाकाराचं स्वातंत्र्य’ मान्य करता आलं पाहिजे…
Ram Navami 2024: Mughal version of Ramayana
Ram Navami 2024: ‘या’ मुघल सम्राटाच्या आईला प्रिय होते रामायण? कोण होता हा सम्राट?
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!
two groups of bjp leaders clash during meeting
मिरा भाईंदर मधील भाजपच्या दोन गटात तुफान हाणामारी; मेहता विरुद्ध व्यास गटाचे मतभेद शिगेला

अंजली दमानिया नेमकं काय म्हणाल्या?

आम आदमी पक्षाचे नेते आशुतोष सेंगर यांनी राजस्थानमध्ये भाजपाच्या जनआक्रोश यात्रेदरम्यान नाच होत असल्याचा व्हिडीओ ट्वीट केला होता. यावरून अंजली दमानिया यांनी चित्रा वाघ यांनी लक्ष्य केलं. ”भाजपाच्या रमेश बिदुरी यांच्या जनआक्रोश महासभेतील हा व्हिडीओ असून या बद्दल आपलं काय मत आहे?” असा प्रश्न त्यांनी चित्रा वाघ यांना विचारला. तसेच ही कोणती संस्कृती आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, यासंदर्भात टीव्ही ९ वृत्तवाहिनीशी बोलताना त्या म्हणाल्या, “चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदचं थोबाड फोडण्यासंदर्भात केले विधान चुकीचं होतं. कोणी काय घालावं, हा ज्याचा त्याचा वयक्तिक विषय असतो. याबाबत चित्रा वाघ यांना बोलण्याची काहीही गरज नव्हती. त्यामुळे त्यांनी ज्या शब्दांचा वापर केला, हे त्यांच्याकडून अपेक्षित नव्हतं.आज राज्यातील राजकारण ज्या दिशेला चाललं आहे, ते बघून वाईट वाटतं. आज राज्यात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. ते सोडून नको ते विषयावर बोललं जाते. या गोष्टी आता सोडून दिल्या पाहिजे.”

हेही वाचा – Delhi Kanjhawala Accident : अंजलीला फरफटत नेणाऱ्या कारच्या मालकाला दिल्ली पोलिसांनी घेतलं ताब्यात; ६व्या आरोपीला बेड्या!

दरम्यान, काल चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद प्रकरणावरून महिला आयोगावरही टीकास्र सोडलं होते. याबाबतही अंजली दामानिया यांनी प्रतिक्रिया दिली. “जर उर्फीवर कारवाई करायची असेल, तर केतकी चितळे, कंगणा रानौत, अमृता फडणवीस यांनाही महिला आयोगाने नोटीस पाठवायला पाहिजे का? मुळात या चर्चांना काहीही अर्थ नाही. त्यामुळे चित्रा वाघ यांनी आता हा विषय इथे थांबवावा”, असे त्या म्हणाल्या.