Anjali Damania On Ashok Kharat Case : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाची राज्यात मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहे. भोंदू अशोक खरातला बलात्काराच्या आरोपाखाली पोलिसांनी अटक केलं असून या संपूर्ण प्रकरणाची एसआयटीद्वारे चौकशी सुरू आहे. या प्रकरणात दररोज अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. याच अशोक खरातबरोबर राज्यातील अनेक दिग्गज नेत्यांचेही फोटो समोर आल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.

दरम्यान, अशोक खरात प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी आरोप केले आहेत. अशोक खरातला कोणी किती कॉल केले? याची यादीच अंजली दमानिया यांनी वाचून दाखवली आहे. तसेच सुषमा अंधारे यांनीही फेसबुकला पोस्ट शेअर करत यावर भाष्य केलं आहे.

अंजली दमानिया यांनी काय आरोप केले?

“रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले आहेत. तसेच त्यांच्या बहिणीचेही २३६ कॉल खरातला झाले आहेत. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तब्बल १७ कॉल्स अशोक खरतला झाले होते. या १७ कॉल्सपैकी १० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग कॉल होते. या कॉलमध्ये सर्वाधिक वेळ २१ मिनिटे त्यांच्या संभाषण झालं”, असा आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे.

“खरी माहिती जनतेसमोर येत नाही. त्यामुळे ही माहिती मी जनेतसमोर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीचे खरातला १७ कॉल झाले असतील तर याचं उत्तर एकनाथ शिंदे यांनी देणं गरजेचं आहे. तसेच चंद्रकांत पाटील यांचे खरातला ८ कॉल, तर सुनील तटकरे यांचे ८ कॉल झाले आहेत आणि आशिष शेलार यांचाही एक कॉल आहे. हे मी फक्त फोन कॉलबाबत सांगितलं आहे. अशोक खरातबरोबर सर्वाधिक कोन बोललं असेल तर त्यामध्ये दुसऱ्या नंबरवर रुपाली चाकणकर या आहेत. ३३ हजार ७२७ सेकंद रुपाली चाकणकर या खरातशी बोलल्या आहेत”, असे आरोप अंजली दमानिया यांनी केले आहेत.

Ashok Kharat Case
सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं आहे?

सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये काय म्हटलं?

“रुपाली चाकणकर यांचे एकूण १७७ कॉल अशोक खरातला झाले, तर त्यांच्या बहिणीचे २३६ कॉल खरातला झाले आहेत. तसेच शिंदे यांचे १७ कॉल अशोक खरातला झाले. एकनाथ शिंदे यांचे सर्वात जास्त संभाषण २१ मिनिटांचं आहे. सर्वसामान्य जनतेपुढे ही माहिती यायला हवी म्हणून मी हे सर्व सांगत आहे. अशा व्यक्तीसोबत एकनाथ शिंदे यांचे १७ कॉल झाले आहेत, (१० इनकमिंग आणि ७ आऊटगोईंग) तर ते कॉल कशा संदर्भात झाले? ते त्यांनी सांगणं गरजेचं आहे. तसेच चंद्रकांत पाटील आणि सुनील तटकरे यांचे प्रत्येकी ८ कॉल झाले आहेत. हे सगळे नॉर्मल कॉल आहेत, व्हॉट्सअ‍ॅपबद्दल माहिती नाही. व्हॉट्सअ‍ॅपची माहिती मिळत नसते. आता पाहायला गेलं तर सर्वाधिक संपर्क कोणासोबत झाला, तर तो रूपाली चाकणकर यांच्यासोबत आहे. ३३ हजार पेक्षा जास्त सेकंद चाकणकर यांच्यासोबत बोलणं झालं”, असं सुषमा अंधारे यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.