अशोक खरात हे नाव सध्या प्रचंड चर्चेत आहे. स्वतःला बाबा म्हणवणाऱ्या या माणसाने अनेक महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे. दरम्यान सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुनील तटकरे आणि रुपाली चाकणकर या विकृत बाबाचे भक्त होते असंही त्यांनी म्हटलं आहे. तसंच ओश्नो जल आणि दोन प्रकारच्या पूजांबाबतही माहिती दिली आहे.

अशोक खरात हा विकृतबाबा-अंजली दमानिया

मागचे दोन दिवस अशोक खरात हे नाव चांगलंच चर्चेत आहे. याला भोंदूबाबा म्हटलं जातं आहे. त्याला भोंदूबाबा न म्हणता विकृतबाबा म्हटलं पाहिजे. भोंदू कुणाला म्हटलं जातं? ज्याने लोकांचे पैसे खाऊन गैरफायदा घेतला त्यांना म्हटलं जातं, अशोक खरातने असंख्य महिलांचं लैंगिक शोषण केलं अशा माणसाला भोंदूबाबा म्हणता येत नाही. हा महाराष्ट्राचा एपस्टिन किंवा विकृत बाबा असंच म्हटलं पाहिजे असं अंजली दमानिया म्हणाल्या.

अशोक खरात ओश्नो जल बनवायचा-अंजली दमानियांचा आरोप

अशोक खरात ओश्नो जल बनवायचा. एक कफ सिरप होतं, त्यात पाणी घालायचे, कुटून व्हायग्रा घालायचे. हे घेण्यासाठी अनेक राजकारणी आहेत, सगळ्या पक्षातली माणसं आहेत जी ओश्नो जल घेण्यासाठी कार पाठवत असत.एक माणूस तिरुपती बालाची ट्रस्टचा विश्वस्त आहे. यातली नावं जी बाहेर आली आहेत त्यात महाराष्ट्रातले अनेक राजकारणी आहे. सो कॉल्ड ओश्नो जल घ्यायला माणसं पाठवायची असा धक्कादायक आरोप अंजली दमानियांनी केला आहे.

ओश्नो प्रे हा काय प्रकार होता?

ओश्नो जल दिल्यानंतर अशोक खरात काय करायचा? दोन प्रकारची सो कॉल्ड साधना करायचा. ओश्नो प्रे अशी पहिली साधना होती त्यात ओम ईशान्येश्वराय नम: असा जप ११ वेळा करायचा असं सांगायचा. त्यानंतर शंकराच्या पिंडीवर असलेला हंडा हलायला लागयचा त्यानंतर जो प्रश्न विचारला जाईल हंडा थांबला की त्या प्रश्नाचं उत्तर असायचं महाशिवरात्र आणि श्रावणी सोमवार यादिवशी करायला सांगायचा. यातला दुसरा प्रकार होता सिद्ध प्रेअर.

सिद्ध प्रेअर हा काय प्रकार होता?

सिद्ध प्रेअरमध्ये होम हवन केलं जायचं. कुणाला सापाचा आवाज यायचा, कुणाला वेगळे वेगळे आवाज यायजे. एक प्रकारचं संमोहन केलं जायचं. शेकडो बायकांचं अशोक खरातने लैंगिक शोषण केलं. ओश्नो जल देऊन पैसे उकळायचे. मध्यमवर्गीय आणि गरीब बायकांचं लैंगिक शोषण अशोक खरात करायचा. महत्त्वाची गोष्ट म्हणजे एक मोठे उपजिल्हाधिकारी आहेत, मी नाव घेणार नाही. मुंबईत कार्यरत असलेले हे कलेक्टर त्या खरातला वकील आणि पैसे पुरवत आहेत. याच डेप्युटी कलेक्टरच्या मुलीचा सातबारा माझ्या हातात आहे. आमच्याकडे सगळे पुरावेही आहेत. अमोल मिटकरी यांनीही एक फोटो ट्विट केला होता. VSR च्या लोकांबरोबर हा खरात होता. रुपाली चाकणकर, सुनील तटकरे हे या अशोक खरातचे भक्त, व्हीएसआर बरोबरचे त्यांचे फोटो. याच व्यक्तीने कुठेतरी घात केला आहे का? असा संशय अमोल मिटकरींना आहे.

खरातने शेकडो महिलांचं लैंगिक शोषण केलं आहे-अंजली दमानिया

खरात लैंगिक शोषण करायचा, लोकांना लुटायचा आणि सावकारी करुन जमिनी हडपत होता. साई सिल्व्हर नावाचं एक मंगल कार्यालय शिर्डीला आहे. त्यांच्याकडूनही अशोक खरातने हडपलं आहे. अशोक खरातने त्यांना पैसे दिले होते जे त्यांना परत करता आले नाहीत म्हणून हे केलं आहे. विकास दिवटेंनी आत्महत्या केली पण हे प्रकरण अशोक खरातने दाबून टाकलं. मी त्यावर आत्ता फार बोलणार नाही. वेळ आल्यानंतर मी सगळ्या गोष्टी माध्यमांपुढे आणणार आहे. विकास दिवटेची फाईल रिओपन करण्यात यावी अशी माझी मागणी आहे असंही अंजली दमानिया म्हणाल्या.