How Did Anjali Damania Obtain the Call Detail Records मागच्या चार ते पाच दिवसांपासून वेगवेगळ्या लोकांकडून प्रतिक्रिया येत आहेत. विषय काय? मी मांडलं काय? लोक काय बोलत आहेत. ३१ मार्च ते काल रात्रीपर्यंत मी मुंबईत नव्हते. त्यामुळे मी माध्यमांशी बोलू शकले नाही. माझी प्रतिक्रिया देण्यासाठी पत्रकार परिषद घेत आहे असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे आणि सगळ्या टीका करणाऱ्या नेत्यांना उत्तर दिलं आहे.
काय म्हणाल्या अंजली दमानिया?
संजय राऊत म्हणाले की मी रॉ ची एजंट आहे का? सुषमा अंधारे तर कायमच माझ्यावर टीका करत आहेत. मला भाजपाच माहिती देते आहे वगैरे सगळं सांगतात.अहो सुषमाताई साधं क्लॉड नावाचं अॅप आहे. त्यात सगळ्या गोष्टी मिळतात. ३१ मार्चच्या दुपारी १२ च्या सुमारास मला एका व्यक्तीचा मेसेज आला की मी अमुक अमुक आहे, माझ्याकडे अशोक खरातांची माहिती आहे, मला ती तुम्हाला द्यायची आहे. मी तुम्हाला फोन करु का विचारलं तेव्हा मी त्यांना हो म्हटलं. त्या व्यक्तीने मला फोन केला. त्यांनी मला सांगितलं की मी तुमची पत्रकार परिषद नेहमी बघतो, मला वाटतं की माझ्याकडे अशोक खरातचा सीडीआर आहे. मी त्यांना विचारला प्रश्न की तुम्ही कोण? तर त्या माणसाने त्याची ओळख खासगी गुप्तहेर अशी करुन दिली. त्या व्यक्तीने मला त्याचं नाव त्याच्या कंपनीचं नावही सांगितलं, मी दुसऱ्या नंबरवरुन सगळे तपशील पाठवतो असंही सांगितलं. साधारण १२.४९ च्या सुमारास त्या व्यक्तीच्या दुसऱ्या फोन नंबरवरुन मला एक्सएल शिट पाठवण्यात आलं. त्यात अनेक तपशील होते. त्याच्या कंपनीच्या वेबसाईटवर गेले, तिथे संपर्काचा नंबर दिला होता तो नंबर मी क्लिक केला तेव्हा तो माझ्या व्हॉट्स अॅपवर गेला. त्यावरुन कळलं की समोरचा माणूस खोटं बोलत नाहीये. ती सगळी माहिती खरी होती. असं अंजली दमानिया यांनी म्हटलं आहे. तसंच ही माहिती मी दाते सरांना दिली होती असंही त्या म्हणाल्या.
काही नंबर माझ्याकडे होते, काही पत्रकारांना मागितले-अंजली दमानिया
माझ्याकडे आलेलं एक्सएल शिट क्लॉडवर पोस्ट केलं. AI चं हे सॉफ्टवेअर आहेत. त्यावरुन मला ही सगळी माहिती मिळाली. तसंच हा सीडीआर आहे असंही कळलं असं म्हणत अंजली दमानियांनी क्लॉड शिट या अॅपवर पोस्ट केलं. त्याने मला ही सगळी माहिती दिली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी दाते सरांना मी तो मेसेज पाठवला. त्यांना मी काय घडलं होतं त्याची कल्पना दिली. मी बेकायदेशीर गोष्टी कुणाकडूनही मागत नाही. माझ्याकडे जी माहिती आली ती मी दाते सरांना, मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवली. काही नंबर माझ्याकडे होते, काही नंबर मी पत्रकारांना विचारले. ज्यांची नावं मी घेतली त्या सगळ्यांचे तपशील मी एआयला दिले होते.
अंजली दमानिया यांनी कुणाची नावं घेतली आणि काय सांगितलं?
देवेंद्र फडणवीस-एकही कॉल नाही
उदय सामंत – एकही कॉल नाही
पंकजा मुंडे-एकही कॉल नाही
रामदास कदम-एकही कॉल नाही
सुषमा अंधारे- एकही कॉल नाही
धनंजय मुंडे- एकही कॉल नाही
संजय राऊत-एकही कॉल नाही
बच्चू कडू- एकही कॉल नाही
राम कदम-एकही कॉल नाही
चित्रा वाघ-एकही कॉल नाही
प्रवीण दरेकर-एकही कॉल नाही
गिरीश महाजन-एकही कॉल नाही
रुपाली चाकणकर आणि सुनील तटकरेंचे सर्वात जास्त कॉल्स
अशा सगळ्यांची नावं मी घेतली होती. ज्यांचे नंबर मिळाले नाहीत त्यांच्या नावापुढे क्रॉस केलं आणि ज्यांचे नंबर मिळाले त्यांची नावं घेतली. लगेच माझ्यावर आरोप करण्यात आले. यात भाजपाचं नाव कसं काय नाही वगैरे विचारण्यात आलं. आम्ही फालतू राजकारण नाही. मिलिंद नार्वेकरांचे आठ कॉल आहेत, अंधारेंनी त्याचे तपशील का मागितले नाहीत? असा सवाल अंजली दमानियांनी केला आहे. मी जेव्हा शोधलं तेव्हा रुपाली चाकणकरांचे पानं भरुन फोन कॉल आहेत, सुनील तटकरेंचे फोन कॉल आहेत. सगळी माहिती तपशीलवार येते. १ एप्रिल २०२५ ते १७ मार्च २०२६ या कालावधीतले हे कॉल आहेत असंही अंजली दमानिया म्हणाल्या आहेत.
