scorecardresearch

Premium

Video: मणिपूर घटनेवर भाष्य करणाऱ्या अण्णा हजारेंकडे संजय राऊतांनी केली ‘ही’ मागणी; म्हणाले…

“गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी करत होतो, पण…”, असेही संजय राऊत यांनी म्हटलं.

anna hajare sanjay raut
संजय राऊत अण्णा हजारे यांच्यावर बोलले आहेत.

मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली होती. यावर समाजसेवक अण्णा हजारेंनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. महिलांवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशीवर लटकवलं पाहिजे, अशी मागणी अण्णा हजारेंनी केली आहे. पण, अण्णा हजारेंनी भाजपाच्या सरकारमध्ये सामील झालेल्या भ्रष्टाचारी लोकांवर आवाज उठवला पाहिजे, असं शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.

ajit pawar
मंत्रिमंडळ बैठकीला गैरहजर असल्यानं नाराजीच्या चर्चा, अजित पवारांनी सोडलं मौन; म्हणाले, “आरे बाबा…”
ajit pawar and sharad pawar5
राष्ट्रवादी पक्ष अन् चिन्ह कुणाचं? निवडणूक आयोगासमोरील सुनावणी संपली; शरद पवार गटाचे वकील म्हणाले…
rahul narwekar asim sarode
“अपात्रतेबाबतच्या कारवाईसाठी लागेल तेवढा वेळ घेणार”, नार्वेकरांच्या वक्तव्यावर असीम सरोदे म्हणाले…
eknath shinde ajit pawar rohit pawar
“एकनाथ शिंदे अन् राष्ट्रवादीतील नेत्यांना फक्त लोकसभेसाठी जवळ घेतलं, पण…”, रोहित पवारांची भाजपावर टीका

संजय राऊत म्हणाले, “गेले काही दिवस अण्णा बोलतील, अशी मागणी करत होतो. मात्र, अण्णांनी थेट मणिपूरच्या विषयाला हात घातला. देशात अशा प्रकारच्या अनेक घटना घडत आहेत. पण, अण्णांची ओळख भ्रष्टाचार विरोधी म्हणून आहे. महाराष्ट्रात भाजपाने पुराव्यासह ज्यांच्यावर आरोप केले, ते सगळे सरकारमध्ये सामील झाले आहेत. यावर अण्णा हजारेंनी आवाज उठवला पाहिजे. अजित पवार, हसन मुश्रीफ किंवा शिवसेनेतून बेईमान होऊन गेलेल्या मंत्र्यांवर हजारो कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. याविषयावर अण्णा हजारेंनी मोठ्या आंदोलनाची घोषणा केली पाहिजे. आम्ही त्यांच्याबरोबर आहोत.”

हेही वाचा : “…तर अजित पवारांना फोडण्याची गरज नव्हती”, महादेव जानकरांचा देवेंद्र फडणवीसांना टोला

“ओवाळून टाकलेले भ्रष्टाचारी सरकारमध्ये सामील झाले आहेत. त्यांचा पंतप्रधान मोदी दिल्लीत सत्कार करत आहेत. दादा भुसे, राहुल कुल, अब्दुल सत्तार, राधाकृष्ण विखे पाटील यांचे घोटाळे अण्णांच्या डोळ्यासमोर घडत आहेत. रामलीला मैदानावर आंदोलन करून अण्णांनी देशाल जाग केलं होतं. आज अण्णांच्या आंदोलनाची खरी गरज आहे. अण्णांच्या आंदोलनामुळे भाजपा सत्तेत आला, तर काँग्रेस पायउतार झाली. आज भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात अण्णांनी रणशिंग फुंकण्याची गरज आहे,” अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Anna hajare speak bjp corrupt leader demand sanjay raut ssa

First published on: 23-07-2023 at 11:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×