‘झेड प्लस’ सुरक्षेसाठी अण्णा हजारे तयार

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर सरकारने त्यांना देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारावी..

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना वारंवार येत असलेल्या धमक्यांच्या पाश्र्वभूमीवर सरकारने त्यांना देऊ केलेली ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारावी, यासाठी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी शनिवारी राळेगणसिद्घी येथे हजारे यांची भेट घेतली. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी फोनवर झालेले संभाषण तसेच विखे व आमदार विजय औटी यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर हजारे यांनी ‘झेड प्लस’ सुरक्षा स्वीकारण्यास तयारी दर्शविली आहे. हजारे यांचे वास्तव्य असलेला यादवबाबा मंदिर परिसर व त्यांच्या कार्यालयाचीही दररोज धातुशोधक यंत्र, श्वानाच्या मदतीने तपासणी करण्यात येत आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Anna ready to take security

ताज्या बातम्या