scorecardresearch

१६ ऑगस्टपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार!

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला

१६ ऑगस्टपासून ११ वी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार!
सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार

करोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाद्वारे जाहीर करण्यात आला. ग्रामीण भागात अकरावीचे प्रवेश महाविद्यालय स्तरावर होणार आहेत, तर राज्यातील सहा महापालिका क्षेत्रात केंद्रीय पद्धतीने प्रवेश होणार आहे. या प्रवेश प्रक्रियेपूर्वी राज्य मंडळातर्फे  सीईटी घेतली जाणार आहे. या सीईटीसाठी ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी राज्य मंडळाने २ ऑगस्टपर्यंतची मुदत दिली होती. दरम्यान प्रवेश ११ वी प्रक्रिया कधी सुरु होणार?, याकडे सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष लागले होते. ११ प्रवेशाची तारीख जाहीर करण्यात आली आहे.

१६ ऑगस्टपासून अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे.  राज्यातील मुंबई महानगर क्षेत्र तसेच पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक अमरावती, नागपूर महानगर पालिका क्षेत्रातील अकरावीचे प्रवेळ केंद्रीय ऑनलाईन पध्दतीने करण्यात येतील. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भाग आणि परीक्षेनंतर अर्जाचा दुसरा भाग भरता येणार आहे.

सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार

अकरावी ऑनलाइन प्रवेशाची पुर्व तयारी आता सुरु झाली आहे. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी सरावाठी १३ ऑगस्टपासून तात्पुर्ती नोंदणी करता येणार आहे. सीईटी परीक्षेपुर्वी अर्जाचा पहिला भागात विद्यार्थ्यांना प्राथमिक माहिती त्यासोबत शुल्क भरुन अर्ज लॉक करायचा आहे. सीईटी परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सीईटीचे गुण आणि पसंती क्रमांक यासाठी अर्जाचा दुसरा भाग भरायचा आहे. त्याच वेळापत्रक काही दिवसांमध्ये संकेतस्थलावर जाहीक करण्यात येईल.

हेही वाचा- अकरावी ‘सीईटी’साठी ११ लाख अर्ज

राज्य मंडळाने जाहीर केलेल्या निकालात १५ लाख ७४ हजार ९९४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामुळे अन्य मंडळांच्या विद्यार्थ्यांनी भरलेल्या अर्जाची संख्या पाहता सुमारे पाच लाख विद्यार्थ्यांनी सीईटीसाठी अर्ज भरला नसल्याचे दिसून येत आहे. राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांपैकी सर्वाधिक २ लाख ५५ हजार ६४३ अर्ज मुंबई विभागातून भरले गेले आहेत, तर सर्वात कमी २० हजार ५६६ अर्ज कोकण विभागातून भरले गेले आहेत.

मुंबई खालोखाल पुणे विभागातून १ लाख ३२ हजार २५५ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. तर २ हजार ७३४ अर्ज जुन्या विद्यार्थ्यांचे आहेत. राज्य मंडळाकडून आता परीक्षेच्या आयोजनाची तयारी सुरू करण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Announced the date of the eleventh online admission process srk

ताज्या बातम्या