आटपाडी तालुक्यातील गळवेवाडी येथे ग्रामपंचायत निवडणुक कारणावरून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना गटात वादावादी आणि मारामारी झाली. रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीवेळी झालेल्या वादाबाबत तक्रार देण्यासाठी सोमवारी सकाळी आटपाडी पोलीस ठाण्यात प्रचंड गर्दी झाली.तक्रार ऐकून किंवा दाखल करण्याऐवजी या गर्दीला पांगविण्याचा प्रयत्न झाला. पोलीसांनी लाठीचार्ज केल्याने तणावात भर पडली.दोन गटातील वादंगामध्ये पोलीसांच्या अनावश्यक आक्रमकपणाच्या भूमिकेने मुळ विषय बाजूला पडला.आटपाडी पोलीसांनाच टिकेचे धनी व्हावे लागले.

रविवारी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी गळवेवाडीमध्ये मतदान झाले.चुरशीच्या लढतीत पूर्वी एकाच पक्षात आणि चांगले सख्य असलेले दोन नेते दोन पक्षात विभागले गेले.सरपंच पदावरील दोन दशकांची मक्तेदारी दोघांमधील मतभेदाचे कारण ठरली.मतदानाच्या दिवशी किरकोळ कारणावरून भाजप आणि बाळासाहेबांची शिवसेना यांच्या गटात वादावादी आणि हाणामारी झाली. मतदानाच्या नंतर सोमवारी सकाळी परत एकदा वादाला नव्याने तोंड फुटले. गळवेवाडी मध्ये पुन्हा दोन गटात वादावादी झाली.याबाबत उमेदवार आणि समर्थक स्त्री पुरुष कार्यकर्त्यांनी तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात धाव घेतली.आटपाडी पोलीस ठाण्याच्या आवारात मोठी गर्दी झाली.

Nashik, Chhagan Bhujbal, dada bhuse,
नाशिकच्या जागेवरून आजी-माजी पालकमंत्र्यांमध्ये वर्चस्वाची लढाई
ramdas tadas
‘‘हे एकदाचं थांबवा,” रामदास तडस यांना भाजप नेत्यांचा निर्वाणीचा इशारा
vijay vadettiwar hansraj ahir kishor jorgewar rajendra vaidya sandeep girhe away from election campaign
नेत्यांचे रूसवे फुगवे! वडेट्टीवार, अहीर, जोरगेवार, वैद्य, गिऱ्हे प्रचारापासून दूर
शरद पवारांच्या आगमनापूर्वीच वर्धेत मानापमान नाट्य; काँग्रेस नेत्यांना व्यासपीठावर स्थान नाही

हेही वाचा: Maharashtra Vidhimandal Hiwali Adhiveshan Live Updates: “तुम्ही आमच्यावर अन्याय केला असला, तरी…”, विधानसभेत फडणवीस-अजित पवार खडाजंगी!

दोन वेळा बाचाबाची आणि वादावादी झाल्यानंतर पोलीस ठाण्याच्या आवारात पुन्हा हे दोन गट एकमेकाला भिडले. त्यामुळे ठाण्याच्या आवारातच गोंधळ झाला.हा गोंधळ थांबवण्यासाठी आटपाडी पोलीसांनी लाठीचार्ज सुरू केला. पोलीसांनी जमावातील महिलांवरच काठ्या उगारल्या. त्यामुळे आधीच्या गोंधळात आणखीन भर पडली. त्यामुळे तक्रार देण्यासाठी गळवेवाडीतुन आलेल्या दोन गटातील लोकांची भंबेरी उडाली. पोलीसांनी राजकीय हस्तक्षेपातून एका गटाची बाजू घेतल्याचा आरोप करत आक्रमक भूमिका घेतली. अखेर निरीक्षक शरद मेमाणे यांनी दोन्ही गटाच्या प्रमुखांसोबत चर्चा करुन हा वाद मिटवला. दोन तासाच्या चर्चेनंतर वाद शमला असला तरी रात्री उशिरापर्यंत तणाव कायम होता.