पत्नीची हत्या केल्यावर सैनिकाची आत्महत्या; वर्ध्यातील घटना

वर्ध्यात सैनिकाने पत्नीवर गोळीबार करत आत्महत्या केल्याने खळबळ

प्रतिकात्मक

वर्ध्यात पत्नीची हत्या केल्यानंतर सैनिकाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. पुलगाव येथील सैन्य दलाच्या दारुगोळा भांडारातील अजयकुमार सिंह याने पत्नी प्रियंका कुमारी (२६) हिच्यावर गोळी झाडत हत्या केली. नंतर स्वतःवर गोळ्या झाडून घेत आत्महत्या केली.

गुरुवारी पहाटे दोन वाजता ही खळबळजनक घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, सैनिक अजयकुमार सिंह भांडारात सेवेत असतानाच कोणालाही सूचित न करता पाणी पिण्याच्या बहाण्याने घरी आला. घरी पोहोचताच त्याने पत्नीची गोळ्या घालून हत्या केली. नंतर त्याने स्वतःवर गोळ्या झाडल्या. गोळीबार झाल्याच्या आवाजाने शेजारी व काही कर्मचारी यांनी घराच्या दिशेने धाव घेतली. अजयकुमारला तात्काळ सावंगीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र सकाळी सात वाजता त्याचा मृत्यू झाला. दोन वर्षांपूर्वी अजयकुमारचं लग्न झालं होतं. पत्नी गर्भवती असून दोघेही बिहारचे रहिवासी होते. भंडार परिसरात इतरांना प्रवेश करण्यास मनाई आहे. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Army jawan killed wife and commit suicide in wardha sgy

ताज्या बातम्या