कराड : कराडलगतच्या कोयना वसाहतीत ११ वर्षीय मुलाच्या लैंगिक शोषणाचा घृणास्पद प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली. याप्रकरणी कराड शहर पोलिसांनी दोघा १९ वर्षीय तरुणांना अटक केली आहे. तर, दोन संशयित अल्पवयीन आहेत. याप्रकरणी काही नावे दडपली जात असल्याची चर्चा आहे.

पीडित अल्पवयीन मुलाच्या आजीने शहर पोलिसात याबाबतची फिर्याद दिली आहे. पोलिसात चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. ओम संजय डुबल व प्रसाद महेश कुलकर्णी अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दोघा अल्पवयीन मुलांनाही ताब्यात घेतले आहे. पीडित मुलगा ८ सप्टेंबर रोजी सायंकाळी चारच्या सुमारास परिसरातील एका मंडळाजवळ खेळण्यासाठी गेला होता.

हेही वाचा >>>Ganesh Visarjan 2024 Live: पुण्यातून अजित पवारांचं गणेशभक्तांना आवाहन; म्हणाले, “जर ३६ तास मिरवणूक चालली तर…”

त्यावेळी प्रसाद कुलकर्णी, ओम डुबल यांच्यासह अन्य दोन अल्पवयीन मुलांनी त्याला नजीकच्या हॉलमध्ये नेले. तिथे त्यांनी त्याला भ्रमणध्वनीवर अश्लील चित्रफिती दाखविल्या. तसेच त्याचे लैंगिक शोषण केले. या कृत्याचे भ्रमणध्वनीवर चलचित्रीकरणही करण्यात आले तसेच पीडित अल्पवयीन मुलाला मारहाणही झाल्याची माहिती समोर येत आहे.