सांगली: नऊ जणांच्या हत्येसाठी मंत्रिकाला विषारी गोळ्यांचा पुरवठा करणारा अटकेत

हत्या कांडातील मुख्य संशयित मांत्रिक अब्बास बागवान याच्या चौकशी दरम्यान विषारी गोळया कोणी पुरवल्या याचा शोध घेत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली.

arrest
( संग्रहित छायचित्र )

सांगली : म्हैसाळ येथील नऊ जणांच्या हत्येसाठी मंत्रिकाला विषारी गोळ्यांचा पुरवठा केल्याबद्दल पुण्यातील मनोज चंद्रकांत क्षिरसागर याला सांगली पोलिसांनी आज अटक केली. न्यायालयाने ८ जुलै अखेर पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

हत्या कांडातील मुख्य संशयित मांत्रिक अब्बास बागवान याच्या चौकशी दरम्यान विषारी गोळया कोणी पुरवल्या याचा शोध घेत असताना पोलिसांना ही माहिती मिळाली. मंत्रिकाने पुण्यातील मनोज क्षीरसागर ( वय४८ रा. तळेगाव दाभाडे, उमंग सोसायटी) याच्याकडून विषारी गोळ्या मिळवल्या. क्षीरसागर याला अटक करण्यात आली असून त्याला ८ जुलै पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

मंत्रिकाने वनमोरे कुटंबाकडून गुप्तधन मिळवून देण्यासाठी घेतलेली रक्कम बहिणीच्या खात्यात जमा करण्यात आली असल्याने पोलीस तिचा शोध घेत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Arrested for supplying poisonous pills to a minister for killing nine people amy

Next Story
“…देवाजवळ आणखी काय मागावे”, शहाजीबापू पाटलांच्या पत्नीने घेतला ‘एकदम ओके मदी’ उखाणा
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी