scorecardresearch

VIDEO: ‘दशातवतारा’चा प्रयोग सुरु असतानाच हार्ट अटॅक; तोल जात असतानाही म्हटला संवाद, त्यानंतर अखेर कोसळला अन्…

दशावताराचा नाट्यप्रयोग सुरु असताना कलाकाराला स्टेजवरच ह्रदयविकाराचा झटका, राणेंच्या वाढदिवसानिमित्त आयोजित होता कार्यक्रम

दशावताराचा नाट्यप्रयोग सुरु असताना कलाकाराला स्टेजवरच ह्रदयविकाराचा झटका आल्याची घटना समोर आली आहे. ह्रदयविकाराचा झटका आल्याने कलाकार स्टेजवरच कोसळला. यावेळी त्याच्या सहकलाकारांनी तात्काळ धाव घेतली. त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सुदैवाने जीव वाचला. या कलाकाराची प्रकृती सध्या स्थिर आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त सिंधुदुर्गातील रेडी येथे हा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

झालं असं की, दशावताराचा नाट्यप्रयोग सुरु असतानाच कलाकाराला ह्रदयविकाराचा झटका आला. यावेळी हा कलाकार स्टेजवरच होता. ह्रदयविकाराचा झटका आल्याने त्याचा तोल जात होता. मात्र त्या अवस्थेतही त्याने त्याच जोशात आपला संवाद म्हटला आणि प्रयोग सुरु ठेवला.

यावेळी तिथे उपस्थित इतर कलाकारांना त्याचा तोल जात असल्याचं लक्षात आलं. यानंतर काही क्षणात तो कलाकार खाली कोसळला आणि सर्वांनीच त्याच्या दिशेने धाव घेतली.

या कलाकाराला तातडीन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Artist felt on stage after hear attack during dashavtar in sindhudurg sgy

ताज्या बातम्या