पंढरपूर : सावळ्या विठुरायाच्या दर्शनासाठी लाखो भाविक मोठ्या श्रद्धेने पंढरीत येतात शेकडोमाईल ऊन वारा पाऊस जलद पंढरीची वारी करणारे वारकरी यांच्या मनात केवळ विठुरायाच्या दर्शनाची आस असते राजकीय नेते पुढारी अधिकारी व्यापारी सर्वसामान्य नागरिक विठ्ठलाच्या चरणी लीन होण्यासाठी पंढरीकडे येत असतात असेच अरुण गवळी यांनी आज विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरीत आले होते नुकतेच जामीनवर सुटलेले अरुण गवळी यांनी पंढरीत दर्शनासाठी आले.
अरुण गवळी यांनी अतिशय साधेपणाने सावळ्या विठुरायाचे आणि रखुमाईचे मोठ्या श्रद्धेने दर्शन घेतले विठुरायापुढे हात जोडून नतमस्तकही झाले.सध्या नगरपालिकेचे निवडणूक असल्याने आचारसंहिता लागू आहे या आचारसंहितेचे काटेकोर पालन करत अरुण गवळी यांनी कोणताही बडे जाऊ किंवा गाजावाजा न करता साधेपणाने दर्शन घेतले.
दर्शन घेतल्यानंतर अरुण गवळी यांनी मंदिर परिसरात पायी फिरले यावेळी मंदिर परिसरातील असलेले भाविक आणि स्थानिक नागरिक यांनी अरुण गवळी यांना हस्तांदोलन तसेच फोटो काढण्याची विनंती केली यावेळी अरुण गवळी यांनी अतिशय प्रेमाने आणि हसतमुख सर्वांशी संवाद साधला.
जगामध्ये शांतता आनंद स्थैर्य लाभो सर्वजण सुखी राहो अशी प्रार्थना विठुरायापुढे केल्याचे अरुण गवळी यांनी प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ज्याचे नाव ऐकताच मुंबई मुंबईसह राज्यात फरकाप उडवत होता असे अरुण गवळी उर्फ डॅडी यांचे मात्र हे भक्ती भावाचे रूप आणि प्रसन्न चेहऱ्याने सर्वांनाच भावून टाकले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.
