लोकसभा निवडणुकीसाठी भाजपानं तयारीला सुरूवात केली आहे. लोकसभानिहाय मतदारसंघात बैठका, मेळावे आणि आढावा भाजपाकडून घेण्यात येत आहे. २०२४ साली ४८ पैकी ४५ हून अधिक जागा जिंकण्याची रणनीती भाजपाकडून आखण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यासारख्या नेत्यांना भाजपानं सोबतीला घेतलं आहे. अशातच ६ ते ७ दिग्गज आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची तयारी भाजपानं केली आहे.
मुंबईसह ठाणे
हेही वाचा : “प्रफुल्ल पटेल ‘घड्याळ’ चिन्ह मिळण्याबाबत तारीख सांगतात, पण…”, सुप्रिया सुळेंचा सवाल
यावर शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार अरविंद सावंत यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रात आमदारांना लोकसभा निवडणुकीत उतरवण्याची वेळ आली का? या प्रश्नावर अरविंद सावंत म्हणाले, “ही वेळ केव्हाच आली आहे. फक्त तारखा जाहीर करायच्या राहिल्या आहेत.”
हेही वाचा : “आम्ही खोलात गेलो तर अवघड जाईल, परत…”, भाजपाचा सुप्रिया सुळेंना थेट इशारा
“मध्य प्रदेश निवडणुकीत काय चाललं पाहिलं आहे का? कृषीमंत्री नरेंद्र सिंह तोमर, खासदार प्रल्हाद सिंह पटेल आणि भाजपा महासचिव कैलाश विजयवर्गीय यांना विधानसभा निवडणुकीत उतरवले आहे. परवा विजयवर्गीय म्हणाले की, ‘मी आता लोकांच्या दारात जाऊन मते मागू का? मी ज्येष्ठ नेता आहे.’ याचा अर्थ काय? सगळ्यांची नाराजी ओढवून निवडणुकीचं तिकिट दिलं आहे. ज्या जागी पराभव झालाय, अशा ठिकाणी सर्वांना तिकिट देण्यात आलं आहे,” असं अरविंद सावंत यांनी म्हटलं.