Aryan Khan Cruise Drugs Case : अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यनला अटक केल्यानंतर चर्चेत आलेले भारतीय महसूल सेवेतील(आयआरएस) अधिकारी समीर वानखेडे यांच्याविरोधात आता त्याच प्रकरणात भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. या प्रकरणातील पंच प्रभाकर साईल याने याप्रकरणी पैशांच्या व्यवहाराचे आरोप केल्यानंतर एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सीबीआयने भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल केला आहे. तसंच, साक्षीदार के.पी गोसावी याचा आर्यन खानच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी उकळण्याचा डाव होता, असा खुलासाही सीबीआयने समीर वानखेडे आणि इतरांविरोधात असलेल्या एफआयआरमध्ये नोंदवला आहे. या प्रकरणी समीर वानखेडे यांच्या पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी ANI या वृत्तसंस्थेला महत्त्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे.

हेही वाचा >> “आर्यन खानप्रकरणात २५ कोटी उकळण्याचा डाव”, समीर वानखेडेंच्या एफआयआरमध्ये सीबीआयचा मोठा खुलासा

Rohit pawar on sunetra pawar
“डोळ्यात पाणी आले, पण त्यापेक्षा…” भावूक झालेल्या सुनेत्रा पवार यांच्याबाबत रोहित पवारांची प्रतिक्रिया
ncp jitendra awhad, sister shubhangi garje
जितेंद्र आव्हाड यांच्या भगिनी म्हणाल्या, “आनंद परांजपे यांनी औकातीत रहावे, घर सांभाळण्यासाठी आम्ही सक्षम…”
What Navneet Rana Said?
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नवनीत राणांची पहिली प्रतिक्रिया, “मला माझी मुलं रोज विचारायची, आई…”
reaction of krupal tumane, MP, eknath shinde, ramtek lok sabha constituency, lok sabha election 2024
उमेदवारी नाकारल्यानंतर शिंदे गटाच्या खासदाराची पहिली प्रतिक्रिया,म्हणाले “हो मी दुःखी, पण….”

“समीर वानखेडे यांच्यावर होत असलेले आरोप चुकीचे आहेत, हे सर्वांना माहिती आहे. हे केवळ आरोप असून आम्ही सीबीआयला सहकार्य करत आहोत. कायदा आणि सुव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे आणि आम्ही एक जबाबदार नागरिक म्हणून तपास यंत्रणेला सहकार्य करण्यास तयार आहोत”, असं क्रांती रेडकर म्हणाली.

देशभक्त असल्याची शिक्षा

 “सीबीआयने काल माझ्या निवासस्थानावर छापा टाकला आणि १२ तासांपेक्षा जास्त वेळ झडती घेतली. माझ्या घरातून त्यांना १८ हजार रुपये रोकड आणि मालमत्तेची ४ कागदपत्रं सापडली आहे. संबंधित मालमत्ता मी सेवेत रुजू होण्यापूर्वी विकत घेतली होती. मला देशभक्त असण्याची शिक्षा मिळत आहे,” अशी प्रतिक्रिया अधिकारी समीर वानखेडे यांनी दिली होती.

हेही वाचा >> “देशभक्त असल्याची शिक्षा मिळतेय”, आर्यन खानला अटक करणाऱ्या अधिकाऱ्याची प्रतिक्रिया

नेमकं प्रकरण काय?

२ ऑक्टोबर २०२१ रोजी एनसीबीने एका क्रूझवर धाड टाकली होती. ड्रग्जप्रकरणात केलेल्या या कारवाईत आर्यन खानसह २० जणांना अटक करण्यात आली होती. तेव्हा एनसीबी मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे होते. एनसीबीने आर्यन खानला जवळपास एक महिना कोठडीत ठेवलं होतं. पण, पुराव्याअभावी आर्यन खानची निर्दोष मुक्तता झाली होती.

त्यातच आर्यन खान प्रकरणातील एनसीबीचे पंच प्रभाकर साईल यांनी समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींची लाच मागण्यात आली होती. त्यातील आठ कोटी वानखेडे यांना देणार होतो, असं साईल यांनी सांगितलं होतं. त्याची गंभीर दखल घेत एनसीबीच्या दक्षता विभागामार्फत समीर वानखेडे यांची चौकशी करण्यात आली होती. त्याचप्रकरणात सीबीआयने छापेमारी केली. तसंच, समीर वानखेडे यांच्याविरोधात गुन्हाही दाखल करण्यात आला. आर्यन खानला सोडण्यासाठी त्याच्या कुटुंबीयांकडून २५ कोटी उकळण्याचा के. पी. गोसावी यांचा डाव होता, असा खुलासा सीबीआयने एफआयआरमध्ये नोंदवला आहे. त्यामुळे समीर वानखेडेंसह इतरांच्या अडचणी वाढल्या आहेत.