Asha Bhosle Death Funeral Mumbai Updates : ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी ब्रीच कँडी रुग्णलायात दाखल करण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचे अवयव निकामी झाल्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. या संदर्भात त्यांचे सुपूत्र आनंद भोसले यांनी आज प्रसिद्धी माध्यमांना माहिती दिली. उद्या सायंकाळी चार वाजता शिवाजी पार्क येथे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार होतील.
सतत हसतमुख राहणाऱ्या, ९२ व्या वर्षीही त्यांचा उत्साह वाखणण्यासारखा होता. लता दीदींची आम्ही शंभरावी करू शकलो नाही, पण आशाताईंची शंभरावी करू शकू असं वाटलं होतं, पण काळाने ती संधी दिली नाही. इश्वरीय आवाज असलेल्या एक आमच्या गायिका आमच्यातून निघून गेल्या, मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो अशी भावूक प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
तर, आशिष शेलार यांनी आशाताई भोसले यांचा काही दिवसांपूर्वीचा व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये त्यांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर… हे गाणं त्यांच्या सुरेल आवाजात गायलं आहे.
भारतीय संगीत क्षेत्रातील स्तंभ कोसळला असल्याची प्रतिक्रिया राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.
Legendary Singer Asha Bhosle Death News Live : आशा भोसले यांचं निधन; अपडेट्स पाहा
एक रत्न आज हरपलं…; आशा भोसलेंच्या आठवणीत अशोक सराफ भावुक, निवेदिता यांनीही शेअर केली पोस्ट
Asha Bhosle: साथसंगतविना आशाताईंनी गायले होते नाट्यपद ; वऱ्हाडाशी होतं खास नातं; पहिला सर्वोच्च सन्मान…
Video: आशा भोसले यांचे पार्थिव निवासस्थानी नेण्यात आले, मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतले अंत्यदर्शन
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आशा भोसले यांचं अंत्यदर्शन घेतलं
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ गायिका, पद्मविभूषण आणि महाराष्ट्र भूषण आशा भोसले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले व त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
https://twitter.com/CMOMaharashtra/status/2043325781628354605
जंगली महाराज रस्त्यावरील बँकेची अशी झाली फसवणूक,जाणून घ्या नेमके काय आहे प्रकरण
आशा भोसले यांच्यामुळे पिंपरी-चिंचवडला नावलौकिक; २२ वर्षांपासून त्यांच्या नावाने पुरस्कार
एकाच वेळी दहा गुंड शहरातून तडीपार- पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांचे आदेश
VIDEO: पहाटेपर्यंत रंगणाऱ्या गप्पा… आमच्यासाठी ‘आशाताई’ म्हणजे कुटुंबच
मोठी बातमी : दीक्षाभूमीवर यंदा बाबासाहेबांचा संयुक्त जयंती सोहळा होणार नाही, खुद्द भंते ससाईंनी परवानगी नाकारल्याने…
"एका सुवर्णयुगाचा अंत...", आशा भोसलेंच्या आठवणीत उषा उत्थुप यांना अश्रु अनावर; म्हणाल्या, "त्यांच्यासारखी गायिका..."
Asha Bhosle Remains Reaches Home: आशा भोसलेंचं पार्थिव निवासस्थानी दाखल
आशा भोसलेंचं पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आलं
Anu Malik on Asha Bhosle Demise: आशा भोसले यांच्या निधनावर अनु मलिक यांची प्रतिक्रिया
“ही बातमी सर्वांसाठीच दुःखद आहे. आपल्या चित्रपटसृष्टीसाठी, संगीत क्षेत्रासाठी, माझ्या कुटुंबासाठी, संपूर्ण भारतासाठी आणि जगासाठीही हा मोठा धक्का आहे. पण हा माझ्यासाठी वैयक्तिक नुकसान आहे. आज मला जे काही नाव मिळाले आहे, त्यात त्यांचा फार मोठा वाटा आहे. मी त्यांना ‘आशा माँ’ म्हणतो, ‘आशा जी’ नाही... मी जेव्हा जेव्हा त्यांच्या दारात गेलो, त्यांनी कधीही नकार दिला नाही... आज मी त्यांना माझी श्रद्धांजली अर्पण करतो... आज असे वाटते की मी पुन्हा एकदा माझी आई गमावली आहे...” - अनु मलिक
कठडेविरहित विहिरीचा सापळा ठरला जीवघेणा; नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाचा दुर्दैवी अंत
मटार, टोमॅटो, पावट्याच्या दरात वाढ
Video : दुसरा जन्म मिळाला तर पुन्हा आशा भोसले व्हायला आवडेल का? त्यांनी दिलेलं 'हे' उत्तर; नेमकं काय म्हणालेल्या?
मिलिंद गवळींनी सांगितला आशा भोसलेंच्या पहिल्या भेटीची आठवण; म्हणाले, "त्यांचा सहवास…"
‘इस अंजुमन मे आपको आना है बार बार’…खासदार नरेश म्हस्के यांच्याकडून आशा भोसले यांना भावनिक श्रद्धांजली
वाढदिवसाच्या दिवशी आशाताईंनी गाणे गाऊन दिले आशीर्वाद, गडकरींनी दिला आठवणींना उजाळा
आशा भोसलेंच्या बायोपिकमध्ये कोणती अभिनेत्री?,आशाताईंनी नागपूरमध्ये स्वत: सांगितले होते नाव…
Shahrukh Khan Pays Tribute to Asha Bhosle: अभिनेता शाहरूख खाननं आशा भोसलेंना वाहिली आदरांजली!
आशाताईंच्या निधनाची बातमी ऐकून मन अत्यंत दुःखी झाले… त्यांचा आवाज भारतीय चित्रपटसृष्टीच्या आधारस्तंभांपैकी एक होता आणि तो पुढील अनेक शतकांपर्यंत जगभर घुमत राहील. त्यांच्या अद्वितीय प्रतिभेची कीर्ती अनेकांपेक्षा अधिक काळ जिवंत राहील. त्यांनी नेहमीच माझ्यावर आशीर्वाद आणि प्रेमाचा वर्षाव केला, आणि मी त्यांना खूप मिस करेन.
शांततेत विसावा घ्या आशाताई… प्रेम आहे तुमच्यावर - शाहरूख खान
Jr NTR Express Grief on Asha Bhosle Demise: ज्युनिअर एनटीआरनंदेखील आशा भोसलेंच्या निधनावर व्यक्त केल्या भावना
आशा भोसलेजी यांच्या निधनाच्या दुःखद बातमीने मन खूप व्यथित झाले आहे. त्यांचा जादुई आवाज अनेक दशकांपासून भारतीय चित्रपटसृष्टीचे हृदय होता आणि त्यांनी लाखो लोकांच्या मनाला स्पर्श केला. त्यांनी मागे एक अमूल्य असा वारसा ठेवला आहे, जो पुढील पिढ्यांसाठी सदैव जिवंत राहील आणि त्यांना नेहमीच आदर आणि प्रेमाने स्मरण केले जाईल. त्यांच्या कुटुंबियांप्रती माझ्या हार्दिक संवेदना. ॐ शांती.
Asha Bhosle Death: अशोक चव्हाण म्हणाले, "आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली"
आशाताईंची नांदेड भेटीची इच्छा अपूर्णच राहिली! आशाताई भोसले केवळ एक अद्वितीय गायिका नव्हत्या, तर त्या तितक्याच उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. त्यांच्या जाण्याने आज त्यांच्या अनेक आठवणी दाटून येत आहेत. कोरोना काळानंतरचा तो दिवस मला आजही आठवतो. आमचे स्नेही प्रसाद महाडकर यांचा फोन आला. ते म्हणाले, आशाताई बोलणार आहेत आणि दुसऱ्या क्षणी आशाताईंचा आवाज कानी पडला. ख्यालीखुशाली विचारल्यानंतर त्या म्हणाल्या, "मला नांदेडला यायचं आहे, गुरुद्वारात दर्शन घ्यायचं आहे. आपण तो कार्यक्रम लवकरच ठरवूया." मी आनंदाने त्यांना होकार दिला आणि त्यांच्या सोयीची तारीख कळवण्याची विनंती केली. पण नियतीला कदाचित ते मान्य नव्हतं. दुर्दैवाने तो योग जुळून आला नाही. ९० च्या दशकात त्या एकदा नांदेडला आल्या होत्या. मात्र, त्यानंतर नांदेडला पुन्हा भेट देण्याची त्यांची इच्छा अपूर्णच राहिली, याची सल आज मनाला जाणवतेय. आशाताईंशी संवाद साधण्याची संधी मला अनेकदा लाभली. कधी प्रत्यक्ष भेटीतून, तर कधी फोनवरील संभाषणातून त्यांचं मोठेपण अनुभवायला मिळालं. एकदा गणेशोत्सवात त्या दर्शनासाठी घरी आल्या होत्या. त्यांची विनम्रता आणि आपुलकी त्यांच्याबद्दलचा आदर अधिकच वाढवणारी होती. नांदेडमध्ये दरवर्षी होणाऱ्या 'संगीत शंकर दरबार' कार्यक्रमासाठी देखील मी त्यांना विनंती केली होती. नांदेडकरांना त्यांचे जादुई सूर प्रत्यक्ष अनुभवता यावेत, अशी माझी मनापासून इच्छा होती. मात्र, त्यावेळी त्यांच्या प्रकृतीमुळे ते राहिलं आणि आता ती संधी कायमचीच हुकली. गायक म्हणून आशाताई भोसले अष्टपैलू होत्याच, पण माणूस म्हणूनही त्या तेवढ्याच 'ग्रेट' होत्या. आज त्या आपल्यात नाहीत, पण त्यांच्या गाण्यांच्या रूपाने त्या सर्वांच्या हृदयात सदैव जिवंत राहतील - अशोक चव्हाण, माजी मुख्यमंत्री
https://twitter.com/AshokChavan1958/status/2043261196477104178
आशा भोसले यांनी जेव्हा सुरेश भटांना विचारले होते, 'मी तुमच्या गझल सादर करू का?'
Asha Bhosle Death News Updates : गौतम अदाणींकडून श्रद्धांजली अर्पण
नदी सुधारणा करताना काय करावे, पर्यावरण मंत्र्यांनी महापालिकेत केल्या या सूचना ! म्हणाल्या….
Asha Bhosle Song for Panchamda - आशा भोसले यांनी काही महिन्यांपूर्वी पंचमदा यांच्यासाठी गायलेल्या गाण्याचा व्हिडीओ व्हायरल
आशा भोसलेंनी पंचमदांसाठी गायलेल्या एका गाण्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे.
PM Narendra Modi Tribute Asha Bhosle : "आशा भोसलेंच्या संगीत प्रवासाने सांस्कृतिक वारशाला समृद्ध केले", पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून श्रद्धांजली
President of India on Asha Bhosle Death: राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी व्यक्त केला शोक
आशा भोसले यांच्या निधनामुळे संगीत विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. भारतात एक वेगळंच संगीताचं युग त्यांनी निर्माण केलं. त्यांच्याशी वैयक्तिक झालेल्या चर्चांच्या अनेक आठवणी माझ्या मनात आहेत. एक कलाकार म्हणून आणि एक व्यक्ती म्हणूनही त्या त्यांचं आयुष्य स्वत:च्या इच्छेनुसार जगल्या. त्यांनी अनेक दशकं भारताच्या संगीत विश्वाला समृद्ध केलं आहे. त्यांचा आवाज अजरामर आहे. संगीतप्रेमींसाठी त्यांचं निधन हे कधीही न भरून निघणारं नुकसान आहे - भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
https://twitter.com/rashtrapatibhvn/status/2043256824124912097
लाडकी बहीण योजना ई-केवायसीच्या नावाखाली महिलेचा विनयभंग… जळगावात गुन्हा दाखल
वय ८५, पण स्टेजवर आल्या आणि नागपूरकर अक्षरशः थिरकले; आशा भोसले यांच्या मैफलीत नेमकं काय घडलं?

आशा भोसले यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन (फोटो-लोकसत्ता ऑनलाइन)
Legendary Singer Asha Bhosle Death News Live : आशा भोसले यांचं निधन; अपडेट्स पाहा
