आई माझी काळूबाई’ या अलका कुबल निर्मित मालिकेच्या साताऱ्यातल्या हिंगणगाव (ता फलटण) येथील मालिकेच्या चित्रकरणाच्या दरम्यान ज्येष्ठ अभिनेत्री आशालता वाबगावकर यांना करोनाची लागण झाली आहे. मालिकेतील अन्य सहकलाकार व तंत्रज्ञानांही कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर साताऱ्यात उपचार सुरु आहेत.  ज्येष्ठ अभिनेत्री  अभिनेत्री आशालता वाबगावकर  यांची प्रकृती चिंताजनक आहे.दरम्यान अचानक करोना बाधित आढळून आल्याने हिंगणगाव येथील चित्रकरण थांबविण्यात आले आहे.

हिंगणगाव (ता फलटण ) ‘माझी आई काळूबाई’ या मालिकेचं चित्रीकरण मागील एक महिन्यापासून सुरु आहे. यासाठी गावात व वाठार स्टेशन (ता कोरेगाव) येथे हे सेट उभारण्यात आला आहे.पुढील दोन वर्षांसाठी चित्रीकरणाची परवानगी जिल्हा प्रशासनाकडून व स्थानिक यंत्रणेकडून घेण्यात आली आहे. चित्रीकरणा दरम्यान काही कलाकरांना करोनाची लागण झाली. त्यामुळे आशालता वाबगावकर यांनाही करोनाची लागण झाली. १६ सप्टेंबर रोजी त्यांना वाई येथील व नंतर सातारा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे अशी माहिती समोर आली आहे.

चार दिवासापूर्वी आशालता वाबगावकर करोना बाधित झाल्याने त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.काही बाधितांना मुंबईला रवाना करण्यात आले आहेअलका कुबल यांना सध्या कोणतीच लक्षणे नाहीत. शिवाय त्यांची पहिली चाचणी नकारात्मक (निगेटिव्ह)आली आहे. अलका कुबल याच आशालता यांना रूग्णालयात घेऊन आल्या. केअर टेकर म्हणून त्यांना त्याच रूग्णालयातील एक स्पेशल रूम देण्यात आला आहे. वेळो वेळी डाॕक्टरांकडून त्या तब्बेतीची माहिती घेत आहेत.

चित्रीकरणा दरम्यान मुंबईहून काही दिवसांपूर्वी गाण्याचं चित्रकारणासाठी २२ कलाकार आले होते. त्यानंतर ही घटना घडली आहे. स्थानिक कलाकार सहाय्यक म्हणून बोलावले होते त्यात कोणाला तरी करोनाची बाधा झाल्याने इतर जण बाधीत झाल्याचे स्थानिक समन्वयक यांनी सांगितले. वेळोवेळी कलाकारांच्या करोना चाचण्या घेण्यात आल्या होत्या.या सगळ्यांची करोना चाचणी नकारात्मक आली होती . कलाकार बाधित आढळल्यानंतर ग्रामस्थांनी येथील चित्रीकरणावर अक्षेप घेतला होता.

संपूर्ण चित्रीकरण परिसर आता प्रतिबंधित करण्यात आला आहे.चित्रीकरण सध्या बंद करण्यात आले असून आता या पुढचे चित्रकरण आता मुंबईत स्टुडिओमध्ये केले जाणार असल्याचे सांगण्यात आले.