लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होणार असे म्हटले जात आहे. आज रात्री किंवा ९ ऑगस्टपर्यंत खातेवाटप तसेच मंत्र्यांची यादी अंतिम केली जाणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. भाजपा प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाणार अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>> मंत्रिमंडळ विस्तार नेमका कधी? मंत्र्यांची यादी फायनल झाली? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले…

MLA Jitendra Awhad alleges that administration is being used for political gain in the state
राज्यात प्रशासनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी, आमदार जितेंद्र आव्हाड यांचा आरोप
mamta banarji
बंगालमध्ये सीएए, एनआरसीची अंमलबजावणी नाही; ममता बॅनर्जी यांची ग्वाही
Military persecution in Jammu and Kashmir will stop but policy will change
जम्मू-काश्मीरमधला लष्करी छळ थांबेल, पण धोरण बदलेल?
Bhatrihari Mahtab recently joined the BJP after leaving the Biju Janata Dal
भाजप – बिजद यांच्या मैत्रीपूर्ण संघर्षांत कुणाची सरशी?

लवकरच राज्य मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. यामध्ये भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना मंत्रिपद दिले जाणार असे म्हटले जात आहे. तर भाजपा प्रदेशाध्यक्षपदची जबाबदारी आमदार आशिष शेलार यांच्याकडे सोपवली जाईल, असे सांगण्यात येत आहे. एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे हे बदल केले जातील अशी चर्चा आहे.

हेही वाचा >>> टीईटी घोटाळा करणाऱ्या मूळ गुन्हेगारास सुळावर लटकवा, चंद्रकांत खैरेंची मागणी

आगामी काळात याची रितसर घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. लवकरच मुंबई महापालिकेची निवडणूक जाहीर होणार आहे. त्यामुळे ही निवडणूक लागण्याआधी शेलार यांच्यावर प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिली जाण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीदरम्यानही शेलार प्रदेशाध्यक्ष असतील, असे म्हटले जात आहे.

हेही वाचा >>> “अरे जाऊद्या हो मंत्रिमंडळ, आधी बदनामी झाली त्याचं बघा” टीईटी घोटाळा प्रकरणी अब्दुल सत्तार आक्रमक

तर दुसरीकडे राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी शिंदे गट आणि भाजपा यांच्यात हालचाली वाढल्या आहेत. मागील अनेक दिवसांपासून राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरून भाजपा आणि शिंदे गट यांच्यात बैठका सुरु आहेत. याच मुद्द्याला घेऊन फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी आतापर्यंत पाच ते सहा वेळा दिल्ली दौरा केला आहे. दरम्यान आजदेखील (८ ऑगस्ट) राज्य मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. शिंदे यांच्या नंदनवन या निवासस्थानी झालेल्या बैठकीत जागा तसेच खातेवाटपावर चर्चा करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Maharashtra Cabinet Expansion: उद्याच मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता, १२ मंत्री घेणार शपथ? ही घ्या यादी

दरम्यान, मंत्रिमंडळ विस्ताराची बातमी लवकरच सांगितली जाईल. मंत्रिमंडळ यादी अद्याप फायनल झालेली नाही. आज रात्री तसेच उद्यापर्यंत ही नावे निश्चित केली जातील, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली आहे.