काँग्रेस पक्ष बंगालमध्ये निवडणूक लढवू शकतो तर तृणमूल काँग्रेस गोव्यात का लढू शकत नाही असा प्रश्न उपस्थित करुन तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष उभा करण्याचा प्रयत्न का असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्रिपुरातील निवडणूक लढवल्यानंतर ममता बॅनर्जी आता गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. मला भाजपला या देशातून राजकीयदृष्ट्या बाहेर पाहायचे आहे. काँग्रेस बंगालमध्ये लढू शकते तर मी गोव्यात का लढू शकत नाही? असा सवाल ममता बॅनर्जी यांनी मुंबईतील एका बैठकीत केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानंतर काँग्रेसप्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचे (यूपीए) अस्तित्व आहेच कुठे, असा सवाल करीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपा आणि काँग्रेस अशी लढत होते त्याच राज्यांमध्ये भाजपा वाढत असल्याचे सांगत काँग्रेसला डिवचले. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यासोबत बैठकीनंतर ममता बॅनर्जी यांनी हे वक्तव्य केले.

आता देशात काँग्रेसमुक्त विरोधी पक्ष देण्याचा प्रयत्न करणाऱ्या ममता बॅनर्जी यांची भेट घेतल्यानंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचाही दृष्टिकोन बदलताना दिसत आहे. शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर ममता बॅनर्जींनी देशात यूपीए नाही असे राष्ट्रवादीचे नेत्यांनी म्हटल्याचे बरोबर आहे असे म्हटले.

“काँग्रेसशिवाय भाजपाला कोणीही पराभूत करू शकत नाही”; ममतांच्या वक्तव्यानंतर काँग्रेसचा पलटवार

ममता बॅनर्जींच्या या वक्तव्यांनंतर आता काँग्रेसकडूनही या संदर्भात प्रतिक्रिया आली आहे. भारतीय राजकारणातील वास्तव सर्वांनाच माहीत आहे. काँग्रेसशिवाय भाजपला कोणीही पराभूत करू शकत नाही, असा विचार करणे हे केवळ स्वप्न आहे, अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली आहे. तर राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनीही ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसबाबत केलेल्या वक्तव्यांवरुन टीका केली आहे.

अशोक चव्हाण यांनी विलासराव देशमुखांचा एक कविता म्हणत असतानाचा व्हिडीओ ट्विट केला आहे. “काँग्रेसची चाल बुद्धिबळातील हत्तीसारखी सरळ आणि थेट धडक देणारी आहे. काँग्रेस उंटासारखी तिरकी चालत नाही अन् घोड्यासारखी अडीच घरंही जात नाही.” अलीकडे काँग्रेसबाबत काही मंडळींना झालेल्या गैरसमजाच्या पार्श्वभूमीवर स्व. विलासराव देशमुख यांच्या या विधानाची सहज आठवण झाली,” असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आलेल्या ममतांनी यांनी काँग्रेस पक्षालाच लक्ष्य केले. देशातील दमनशाहीच्या विरोधात रस्त्यावर उतरून लढण्याची आवश्यकता आहे पण कोणी लढण्यास तयार नसल्यास किंवा सारखे परदेशात जात असल्यास आम्ही तरी काय करणार, असा सवाल करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना तसेच नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधताना बॅनर्जी यांनी काँग्रेसच्या कमकुवतपणावर बोट ठेवले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ashok chavan tweeted vilasrao deshmukh video after mamata banerjee attack congress abn
First published on: 02-12-2021 at 12:23 IST