scorecardresearch

Premium

सांगली : लैंगिक अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न

पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत सांगलीत वास्तव्यास असून संशयित तरूण प्रसाद मोतुगडे (वय २०) याने दोन दिवसापुर्वी राहत्या घरातून रिक्षाने तिला आपल्या घरी आणले.

sexual assault murder

सांगली : सांगलीतील एका अल्पवयीन मुलीला जबरदस्तीने रिक्षातून नेउन लैंगिक अत्याचार करून धारदार कटरने हाताची नस कापून जिवे मारण्याचा प्रयत्न मिरजेत घडला असून या प्रकरणी पिडीतेने गुरूवारी रात्री शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार पिडीत सांगलीत वास्तव्यास असून संशयित तरूण प्रसाद मोतुगडे (वय २०) याने दोन दिवसापुर्वी राहत्या घरातून रिक्षाने तिला आपल्या घरी आणले. घरी आणल्यानंतर तिच्यावर बळजबरी करीत लैंगिक अत्याचार केले.

यानंतर त्याने धारदार कटरने तिच्या हाताची नस कापून गळ्यावरही वार केला. यामध्ये ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रूग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. या प्रकरणी पिडीतेने संशयिताविरूध्द फिर्याद दाखल केली आहे. दरम्यान,  देववाडी (ता. शिराळा) येथे राहूल भोसले या तरूणाने अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष  दाखवून बलात्कार केल्याची तक्रार पिडीतेच्या आईने शिराळा पोलीस ठाण्यात दिली. लग्नासाठी चाललेल्या चर्चेतून झालेल्या ओळखीतून संशयिताने पिडीतेवर अत्याचार केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

elders saved the child slife Varanasi Viral Video
VIDEO: पावसाच्या पाण्यात विजेचा धक्का बसल्याने तडफडत होता चिमुकला, देवदूत बनून आलेल्या वृद्धांनी वाचवले प्राण
Royal Enfield Bullet 350 launched
नाद करायचा नाय! बाकी कंपन्या बघतच राहिल्या, देशात दाखल झाली नवी बुलेट, किंमत फक्त…
Justin truedeo and narendra modi
निज्जर हत्येप्रकरणी भारतावर आरोप करणाऱ्या कॅनडाला उपरती; पंतप्रधान ट्रुडो म्हणाले, “जगभरात भारताचा प्रभाव…”
Gunratna sadavarte
“गांधींचे विचार संपले, या देशात आता नथुराम…”, गुणरत्न सदावर्ते बरळले; म्हणाले, “भारताचे तुकडे…”

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Attempted murder by sexual assault a minor girl ysh

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×