पंढरपूर : येथील श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मंदिरास आकर्षक तिरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने रोषणाई करण्यात आल्याची माहिती श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली आहे.येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील श्री विठ्ठल सभा मंडप, मंदिरातील आतील व बाहेरील बाजूस, श्री संत नामदेव पायरी या ठिकाणी तिरंग्याची आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. याशिवाय, श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी भक्त निवास, वेदांता व्हिडिओकॉन भक्तनिवास इत्यादी ठिकाणी देखील रोषणाई करण्यात आली आहे. संपूर्ण रोषणाई मंदिर समिती मार्फत करण्यात आली असून, यासाठी विद्युत विभाग प्रमुख शंकर मदने यांच्यासह सात कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले आहेत. प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून केलेली ही तिरंगा रंगाची सजावट भाविकांसाठी पर्वणी ठरत आहे.

Thieves stole gold ornaments from a safe in a bungalow in Loni Kalbhor area Pune news
पुणे: पलंगाखाली पुरलेल्या तिजोरीतील दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला- लोणी काळभाेरमघील घटना
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
mirkarwada latest news martahi news
रत्नागिरी : मिरकरवाडा बंदरातील अतिक्रमण मोहिमेविरोधात न्यायालयाचे जिल्हाधिकारी, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांना समन्स
संदूक: आव्हानात्मक ‘लायर’
Rahul Solapurkar Shivaji Maharaj
“मिठाईचे पेटारे नव्हते, शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्यातून सुटले”, मराठी अभिनेत्याच्या वक्तव्याने वादंग
Loksatta kutuhal Stone of Ghrishneshwar temple
कुतूहल: घृष्णेश्वर मंदिराचा पाषाण
maha Kumbh Mela and flow of techniques in Hindu religion culture society structure
‘कुंभमेळा’ आणि हिंदू धर्म-संस्कृती-समाज रचना यांतील तंत्र प्रवाह!
Loksatta natyarang Ramayana drama Urmilyan Indian culture
नाट्यरंग: ऊर्मिलायन;दृक् श्राव्यकाव्याची नजरबंदी
Story img Loader