महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय गदारोळावर बहुजन पक्षाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट केले आहे. सत्ता स्थापन करण्यासाठी एकनाथ शिंदेंच्या गटासमोर भाजपामध्ये विलिन होण्याची अट घालण्यात आली आहे का? असा सवाल आंबेडकरांनी केला होता. आंबेडकरांच्या या ट्विटनंतर वेगवेगळ्या तर्क-वितर्कांना उधाण आले होते. मात्र, भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी याबाबत खुलासा करत आंबेडकरांना टोला लगावला आहे.

हेही वाचा- “काल तुम्ही जे काही बोललात, जे काही झालं ते…”; उद्धव ठाकरेंनी राजीनाम्याची तयारी दर्शवल्यानंतर बंडखोर आमदाराचं खुलं पत्र

भाजपाचा खुलासा

प्रकाश आंबेडकर काय बोलतात याचा भाजपाशी काहीही संबध नसल्याचे भातखळकर म्हणाले. या अगोदरही त्यांनी चित्रविचित्र व्यक्तव्य केली आहेत. शिवसेनेत जे सुरु आहे तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. याचा भाजपाशी काहीही संबंध नसल्याचे भातखळकरांनी स्पषट केले. भाजपाची भुमिका स्पष्ट असून आम्ही जनतेच्या प्रश्नांसाठी संघर्ष करत राहू असंही भातखळकर म्हणाले. आमच्या पाठीत खंजीर खूपसून उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. महाविकास आघाडी सरकार अंर्तविरोधाने भरलेलं सरकार आहे. आघाडीतील तिनही पक्ष एकमेकांशी भांडतात आणि हे राज्यसभा आणि विधापरिषदेच्या निवडणुकीत समोर असल्याचे भातखळकर म्हणाले.

हेही वाचा- एकनाथ शिंदे प्रकरण : एवढे मंत्री, आमदार एकाच वेळी राज्याबाहेर गेलेच कसे?; शरद पवार संतापले

उद्धव ठाकरेंची बंडखोर आमदारांना भावनिक साद

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे शिवसेनेत फळी निर्माण झाली आहे. जवळजवळ ४० पेक्षा जास्त शिवसेनेच्या आमदारांनी शिंदेंना समर्थन दिल्यामुळे शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. या सगळ्यांच्या मागे भाजपाचाच हात असल्याचा आरोप शिवसेना नेते संजय राऊत यांनी केला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल भावनिक साद घालत बंडखोर आमदारांना परतीची हाक दिली आहे.