ओळखीचा गैरफायदा आणि पिस्तूलाचा धाक दाखवून खंडाळा येथील वॉटर पार्कमध्ये विनयभंग केला, औरंगाबाद येथील कृष्णासागर रेसिडेन्सी बारामती, औरंगाबाद शहरात, शरणापूर फाटा येथील एका लॉजवर आणि हर्सूल येथे एका घरामध्ये संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊ बलात्कार केला. येथे ठिकठिकाणी गुंगीचे औषध देऊन वेळोवेळी बलात्कार केला असल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपीचा भाऊ व मेव्हुण्यानेही पीडित महिलेचा विनयभंग केला आहे. याप्रकरणी तीन जणांवर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांनी दिली. बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आरोपी एमआयएममधून निलंबित झालेले नगरसेवक असल्याचे समजते. आरोपी आणि पीडित महिला २०१५ साली औरंगाबाद महानगर पालिकेत नगरसेविक म्हणून एकाच पक्षातून निवडून आले होते.
निलबिंत नगरसेवक मतीन रशीद सैय्यदसह अन्य दोघांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपी मतीनसह मेहुणा हामेद सिद्धकी आणि भाऊ मोहसीन रशीद सैय्यद यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वादग्रस्त एमआयएममधून निलंबित नगरसेवक मतीन रशीद सैय्यद याची पक्षातून अगोदरच हकालपट्टी करण्यात आलेली आहे. त्याच्यावर औरंगाबाद येथे देखील बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचं पोलिसांनी सांगितलेले आहे. घटनेचा अधिक तपास चाकण पोलीस करत आहेत. आरोपी आणि पीडित महिला हे विद्यमान नगरसेविका आहेत अशी माहिती DCP स्मार्तना पाटील यांनी लोकसत्ता ऑनलाइन शी बोलताना दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलंबित नगरसेवक मतीन आणि फिर्यादी महिला हे दोघे ओळखीचे आहेत. २७ वर्षीय पीडित महिलेला मतीनने तुमची आई आजारी आहे असं सांगून पीडित महिलेसह दोन मुलांना मोटारीत बसवून खंडाळा येथील वॉटर पार्क येथे घेऊन गेला. अगोदर पिस्तूलाचा धाक दाखवत विनयभंग केला, त्यानंतर औरंगाबाद येथील कृष्णासागर रेसिडेन्सी बारामती, औरंगाबाद शहरात, शरणापूर फाटा येथील एका लॉजवर आणि हर्सूल येथे एका घरामध्ये संबंधित महिलेला गुंगीचे औषध देऊ बलात्कार केला. तसेच महिलेच्या कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. दरम्यान, मेहुणा हामेद आणि भाऊ मोहसीन यांनी पीडित महिलेचा विनयभंग केल्याचं देखील फिर्यादीद म्हटलं आहे. त्यानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा सर्व प्रकार २६ नोव्हेंम्बर २०१८ ते २४ फेब्रुवारी २०१९ या दरम्यानच्या महिन्यात घडला आहे.