Premium

अहमदनगरमध्ये संदल मिरवणुकीत नाचवले औरंगजेबाचे फलक, चौघांविरोधात गुन्हा दाखल

रविवारी रात्री संदलच्या दरम्यान हा प्रकार घडल्याचं समोर आलं आहे.

Ahmednagar Sandal
संदल मिरवणुकीत औरंगजेबाचा फलक नाचवल्याचा प्रकार घडला आहे.

मोहिनीराज लहाडे, प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अहमदनगरच्या फकीरवाडा भागात संदल उरुसच्या मिरवणुकीत मुघल बादशाह औरंगजेबाच्या प्रतिमेचे फलक झळकवत काही तरुणांनी नाच केला आणि घोषणाबाजी केल्याच्या आरोपावरुन भिंगार कँप पोलिसांनी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काल, रविवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास घडली.

पोलिसांनी कुणा कुणावर गुन्हा दाखल केला?

पोलिसांनी औरंगजेबाचे फोटो नाचवल्याच मोहम्मद सरफराज इब्राहिम उर्फ सरफराज जहागीरदार, अपनाम सादिक शेख उर्फ खडा, शेख सरवर, जावेद शेख या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. शहराच्या फकीरवाडा भागातील दममारी हजारी मशिदीत दरवर्षी ऊरूस संदल भरवला जातो. यंदा त्यासाठी कर्णकर्कशः आवाजात डीजे वाजवण्यात आला. यावेळी काही तरुणांनी डोक्यावर मोघल बादशाह औरंगजेब याची प्रतिमा असलेले फलक झळकावले.

यासंदर्भातील ध्वनी चित्रफीत समाज माध्यमात प्रसारित झाली होती. त्याची चर्चा शहरात होत होती. त्यानंतर पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत गुन्हा नोंदवला आहे. पोलीस नाईक नवनाथ धोंडे यांनी फिर्याद दिली आहे.

काय आहे व्हिडीओमध्ये?

या व्हिडीओमध्ये एका मिरवणुकीत औरंगजेबाचा फोटो घेऊन एक युवक नाचताना पाहायला मिळत आहे. हा व्हिडीओ रविवारचा आहे. संदल मिरवणुकीतला हा व्हिडीो असल्याचं समोर आलं आहे.

देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया

दरम्यान, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रसारमाध्यमांनी यासंदर्भात विचारणा केली असाता त्यांनी यासंदर्भात राज्य सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे. “औरंगजेबाचे फोटो जर कुणी झळकवत असेल, तर हे इथे मान्य केलं जाणार नाही. या देशात, महाराष्ट्रात आमचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजच असू शकतात. कुणी औरंग्याचं नाव घेत असेल, तर त्याला माफी नाही”, असं फडणवीस म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-06-2023 at 17:24 IST
Next Story
“देशात शरद पवारांची विश्वासार्हता राहिली नाही”, विजय शिवतारेंची सडकून टीका; म्हणाले, “अशा प्रवृत्तींना…”