योगगुरु बाबा रामदेव हे अनेकवेळा त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत राहिले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी महिलांच्या कपड्यांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानामुळे ते अडचणीत सापडले आहे. यासंदर्भात राज्य महिला आयोगाने बाबा रामदेव यांना नोटीस पाठवली होती. याप्रकरणी आता बाबा रामदेव यांनी माफी मागितली आहे.

याबाबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर म्हणाल्या की, “बाबा रामदेव यांचा खुलासा काल राज्य महिला आयोगाकडे प्राप्त झाला आहे. त्यामध्ये आम्ही ‘बेटी बचाओ आणि बेटी पढाओ’ यामाध्यमातून महिलांसाठी काम करतो. आमची संस्था ही महिलांचा सन्मान करणारी आहे.”

pankaja munde manoj jarange (1)
“ही गोपीनाथ मुंडेंची औलाद कधी…”, मनोज जरांगेंवरील कथित टीकेवर पंकजा मुंडेंचा खुलासा
Ajit pawar on nephews
Video: “सर्व संस्था त्यांनी काढल्या, पण जन्म झाला नव्हता”, अजित पवारांचा टोला, पुतण्यांचा उल्लेख करत म्हणाले…
deputy leader of Shiv Sena Thackeray group Sushma Andhare criticized BJP
‘‘…हा तर भाजपाचा डीएनए, आश्चर्य वाटण्यासारखं काही नाही” सुषमा अंधारे यांची टीका, म्हणाल्या…
Pankaja munde and jyoti mete
बीडमध्ये तिहेरी लढत? पंकजा मुंडेंसमोर आता ज्योती मेटेंचंही आव्हान; मविआनं डावलल्यानंतर म्हणाल्या, “पुढची पावलं…”

“ठाण्याच्या कार्यक्रमात मी एक तास बोलत होतो. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला गेला. मला जे बोलायचं नव्हते, असा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला. माझ्या बोलण्याने कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर दिलगीरी व्यक्त करतो,” असे बाबा रामदेव यांनी महिला आयोगाला दिलेल्या पत्रात म्हटल्याचं, रुपाली चाकणकर यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.

हेही वाचा : राज्यपालांची पदमुक्त होण्याची इच्छा? राजभवनाने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले…

तसेच रुपाली चाकणकर यांनी ट्विटही केलं आहे. त्यात म्हटलं की, “बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांनी ठाणे येथील एका सार्वजानिक कार्यक्रमात महिलांसंबंधी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन विधान केले होते. या वक्तव्याची राज्य महिला आयोगाने गंभीर दखल घेत बाबा रामदेव उर्फ राम किसन यादव यांना याबाबतीत आपला खुलासा दोन दिवसाच्या आत सादर करण्यासाठी नोटिस पाठवली होती. याबाबत त्यांचा खुलासा कार्यालयाला प्राप्त झाला असून, केलेल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली आहे,” असे चाकणकर यांनी सांगितलं.

हेही वाचा : संजय राऊतांना कोर्टात बोलवून अटक होणार? कटकारस्थानाबाबत मोठा गौप्यस्फोट

काय म्हणाले होते बाबा रामदेव?

शुक्रवारी बाबा रामदेव यांनी ठाण्यात घेतलेल्या योग शिबिरामध्ये हा सगळा प्रकार घडला. यावेळी अमृता फडणवीसांच्या उपस्थितीत बाबा रामदेव यांनी हे विधान केलं होतं. “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण, त्या नेहमी आनंदी राहतात. जसा आनंद अमृता फडणवीस यांच्या चेहऱ्यावर आहे, तसाच तुमच्या चेहऱ्यावर पाहायचा आहे”, असं बाबा रामदेव म्हणाले.

यानंतर पुढे बोलताना त्यांनी, “महिला साडी नेसल्यावर, सलवार कुर्त्यावरही चांगल्या दिसतात आणि काही नाही घातलं तरी चांगल्या दिसतात”, असं आक्षेपार्ह विधान केलं आणि वादाला सुरुवात झाली होती.