Baba Siddique Death Case Update in Marathi : राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबरच्या रात्री हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई गटाने बाबा सिद्दीकींच्या हत्येचा कट रचला होता. याप्रकरणी आतापर्यंत आठ जणांना अटक केली असून पोलिसांकडून कसून चौकशी चालू आहे. या चौकशीतून अनेकविध माहिती समोर येतेय. यानुसार, आरोपींच्या मोबाईलमध्ये झिशान सिद्दीकी यांचाही फोटो सापडला आहे. तसंच, माहितीची देवाणघेवाण करण्याकरता ते सोशल मीडियाचा वापर करत होते. ANI ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

गोळीबार करणाऱ्यांपैकी धर्मराज कश्यप, गुरमेल सिंह या दोघांना घटनास्थळावरून अटक करण्यात आली होती. या दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांकडून त्यांची चौकशी केली जात आहे. या चौकशीतून विविध माहिती समोर येत आहे. आता या आरोपींनी माहिती शेअर करण्याकरता स्नॅपचॅटचा वापर केला होता. तसंच, बाबा सिद्दीकींच्या हत्येतील आरोपीच्या फोनमध्ये बाबा सिद्दीकींचा मुलगा झिशान सिद्दिकींचा फोटो सापडला आहे. हे छायाचित्र आरोपींसोबत त्यांच्या हँडलरने स्नॅपचॅटद्वारे शेअर केले होते. गोळीबार आणि कट रचणाऱ्यांनी माहिती शेअर करण्यासाठी स्नॅपचॅटचा वापर केल्याचे तपासात उघड झाले, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
vegetable vendor Murder, Murder at Mira Road,
मिरा रोड येथे भाजी विक्रेत्याची गळा चिरून हत्या
selfie point shock death
भाईंदर: महापालिकेच्या सेल्फी पॉईंटमधील विजेचा धक्का, जखमी मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू
passenger dies after st bus crash in swargate depot premises
स्वारगेट स्थानकाच्या आवारात एसटी बसच्या धडकेत प्रवासी तरुणाचा मृत्यू
construction worker dies after gets trapped in jcb machine
जेसीबी यंत्राखाली सापडून बांधकाम मजुराचा मृत्यू
Sidhu Moosewala baby brother face reveal
सिद्धू मूसेवालाच्या लहान भावाला पाहिलंत का? गोंडस शुभदीपचा फोटो पाहून चाहते म्हणाले, “Sidhu is Back”
girl died while removing akash kandil
आकाशकंदिल काढताना तोल गेला, ११ व्या मजल्यावरून पडून तरुणीचा मृत्यू

सुरक्षा रक्षक निलंबित

हत्येच्या वेळी बाबा सिद्दीक यांच्यासोबत उपस्थित असलेले पोलीस सुरक्षा रक्षक कॉन्स्टेबल श्याम सोनवणे यांना निलंबित करण्यात आले आहे. त्यांचीही चौकशी करण्यात येणार असल्याचं मुंबई पोलिसांनी सांगितलं.

डोंबिवलीतील टोळीचा सहभाग उघड

 माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे याच्या टोळीचा सहभाग उघड झाला आहे. त्यानुसार, गुन्हे शाखेने सप्रेसह त्याच्या अंबरनाथ आणि पनवेल येथील साथीदारांना अटक केली आहे. आरोपींनी सिद्दीकी यांच्यावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना शस्त्र पुरविल्याचे उघड झाले आहे. तसेच सिद्दीकी यांचे मारेकरी आरोपींसोबत कर्जत येथे वास्तव्यालाही होते, असे समजते.

हेही वाचा >> Baba Siddique Shot Dead : बाबा सिद्दीकी यांच्यासह झिशान सिद्दीकीही होते रडारवर, हल्लेखोरांचा नेमका कट काय होता?

डोंबिवलीतील सराईत गुन्हेगार नितीन सप्रे (३२) याच्यासह अंबरनाथमधील संभाजी पारधी (४४), प्रदीप दत्तू ठोंबरे (३७) चेतन दिलीप पारधी (२७) आणि पनवेलमधील राम फुलचंद कानोजिया (४३) यांना अटक करण्यात आली आहे. या टोळीचा सप्रे प्रमुख असून तो अकोटमधील पसार आरोपी शुभम लोणकरच्या संपर्कात होता. नितीनवर हत्या, हत्येचा प्रयत्न, शस्त्रबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद आहेत. नितीन हा रामच्या मदतीने त्याची टोळी चालवत होता. शस्त्रासंबंधी तो शुभम लोणकरच्या संपर्कात आला. शुभम पाठोपाठ तो याप्रकरणातील आरोपी मोहम्मद झिशान अख्तरच्या संपर्कात होता. त्यांच्या सांगण्यावरून तो या कटात सहभागी होता. त्याने साथीदारांच्या मदतीने तीन पिस्तुली मारेकऱ्यांना दिल्या. त्या गुन्हे शाखेने जप्त केल्या आहेत.