Baba Siddique murder case : बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर इतर दोन आरोपी फरार आहेत. दरम्यान, आता याप्रकरणी फेसबूक पोस्ट करणाऱ्या शुभम लोणकर नावाच्या एका संशयित आरोपीच्या भावाला पुण्यातून अटक करण्यात आली आहे. प्रवीण लोणकर (२८) असं या आरोपीचं नाव आहे. दोघेही भाऊ बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या कटात सहभागी असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

शनिवारी रात्री झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर या हत्येची जबाबदारी स्वीकारणारी एक फेसबुक पोस्ट शुबू लोणकर महाराष्ट्र या फेसबूक पेजवरून शेयर करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. शुबू हा अकोला जिल्ह्याच्या अकोट येथील शुभम रामेश्वर लोणकर आहे, अशी माहिती पुढे आली होती. या दृष्टीने पोलीस तपास करत होते.

minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Mumbai police absconded
मुंबई: १९ वर्षांपासून फरार आरोपी आरोपीला अखेर पकडले
Ashok Pawar and Rushiraj Pawar
Ashok Pawar : आमदार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करून मारहाण केल्याचा गंभीर आरोप; राजकारणात खळबळ
salman khan lawrence bishnoi
पुन्हा धमकी, पुन्हा बिश्नोई गँग; सलमान खानच्या नावाने मुंबई पोलिसांना आला संदेश!
pune Porsche car accident
सर्वोच्च न्यायालयाने जामीन फेटाळाल्यानंतर अरुणकुमार सिंग शरण, कल्याणीनगर अपघात प्रकरणात अल्पवयीनाच्या रक्त नमुन्यात बदल
burglar in pune arrested involved in four crime cases
घरफोडी करणाऱ्या चोरट्याला पकडले; चार गुन्हे उघड
Baba Siddique Shot dead
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणः आणखी एका आरोपीला अटक

हेही वाचा – बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणाचे अकोला ‘कनेक्शन’? जबाबदारी स्वीकारणाऱ्या पोस्टमुळे…

या तपासादरम्यान पोलिसांनी त्याच्या अकोट येथील घरी दाखल झाले. मात्र, घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांकडे विचारपूस केली असता, दोघेही भाऊ पुण्यात राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुण्यातील घरी छापा टाकला. त्यावेळी शुभम लोणकर हा फरार असल्याचे त्यांच्या लक्षात आलं. तसेच पोलिसांनी त्याचा भाऊ प्रवीण लोणकरला अटक केली. हे दोघेही बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचा कटात सहभागी होते, असा प्राथमिक अंदाज आहे. पोलीस आता शुभम लोणकर याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, याप्रकरणी आतापर्यंत तिघांना अटक करण्यात आली आहे. यापूर्वी पोलिसांनी वांद्रे येथून दोघांनी अटक केली होती. आता पुण्यातून आणखी एकाला अटक केली आहे. गुरुमीत सिंग आणि धर्मराज कश्यप असं आधी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत. यापैकी गुरुमीत सिंग हा हरियाणाचा, तर धर्मराज कश्यप उत्तर प्रदेशातील रहिवासी आहे. दोघांनाही आज न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. न्यायालयाने गुरुमीत सिंगला २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली, तर धर्मराज कश्यप याची हाडासंदर्भातली एक चाचणी करण्याचे निर्देश दिले. आरोपी धर्मराज कश्यपने त्याचं वय कोर्टात १७ वर्षे असं सांगितलं. त्यामुळे न्यायालयाने याप्रकरणी त्याच्या वय निश्चितीसाठी हाडांची चाचणी करण्यासंबंधीचे निर्देश दिले. या चाचणीचा अहवाल आल्यानंतर त्याच्याविषयीचा निर्णय घेतला जाणार आहे.