Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे महाराष्ट्रासह देश हादरला. या घटनेचे तीव्र पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. बाबा सिद्दीकी यांच्या मारेकऱ्यांना सोडणार नाही असं एकनाथ शिंदेंनी म्हटलं आहे. बाबा सिद्दीकी यांनी १२ ऑक्टोबरला हत्या करण्यात आली. या प्रकरणात एकूण तिघांना अटक करण्यात आली आहे. बाबा सिद्दीकी यांच्यावर हल्ला करणारा तिसरा आरोपी फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

१२ ऑक्टोबरला रात्री ९ वाजता बाबा सिद्दीकींची हत्या

१२ ऑक्टोबरला रात्री ९ च्या सुमारास बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांचा मुलगा आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयात चालले होते. त्यावेळी तीन हल्लेखोर आले त्यांनी गोळ्या झाडल्या. ज्यानंतर बाबा सिद्दीकी कोसळले. त्यांना लिलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. १२ ऑक्टोबरच्या रात्री वांद्रे या ठिकाणी बाबा सिद्दीकी ( Baba Siddique ) हे त्यांच्या मुलाच्या ऑफिसकडे जात होते. त्यावेळी दसरा असल्याने लोक फटाके वाजवत होते, या फटाक्यांच्या आवाजत बाबा सिद्दीकींवर तीन रुमाल बांधलेल्या लोकांनी येऊन गोळीबार केला. त्यांनी एका पाठोपाठ एक सहा राऊंड झाडले. यानंतर हल्लेखोर तिथून पसार झाले. दोन हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली. तर तिसरा आरोपी हा शुभम लोणकरचा भाऊ प्रवीण लोणकर आहे. शुभम लोणकर आणि शिव कुमार हे दोघं फरार आहेत. ज्यांचा शोध पोलीस घेत आहेत.

Salman Khan struggles with sleepless nights after Baba Siddique’s murder
बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर ‘अशी’ आहे सलमान खानची अवस्था; झिशान सिद्दिकी खुलासा करत म्हणाले, “भाई खूप…”
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Pistol seized Panvel, Panvel, Pistol seized, loksatta news,
पनवेलमधील आरोपीच्या घरातून पिस्तुल जप्त
son kills mother Ghaziabad crime news
Son Kills Mother: वीस हजारांसाठी जन्मदात्या माऊलीचा खून; मित्रांनी आईचे हात धरले, मुलानं वीट घेतली आणि…
Baba Siddique murder case, conspirator, person arrested from Haryana,
बाबा सिद्दिकी हत्या प्रकरण : कट रचणारा व शूटर्समधील दुवा पोलिसांच्या हाती, हरियाणातून एकाला अटक
Baba Siddique murder case It is revealed that the accused rented a house from the website
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण : आरोपींनी संकेतस्थळावरून घर भाड्याने घेतल्याचे उघड
Baba Siddique lawrence bishnoi
बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचा हत्येपूर्वी बिश्नोईच्या भावाशी संपर्क, पोलीस चौकशीत कबुली; नेमकं काय बोलणं झालेलं?
laxman dhoble leaving bjp joining sharad pawar ncp
आपटीबार : दुबळे कारण

बाबा सिद्दीकींची हत्या करणारा ‘तो’ आरोपी अल्पवयीन नाही, २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी

बाबा सिद्दीकींच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवणार

बाबा सिद्दीकींबाबत प्रश्न विचारला असता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, “बदलापूरच्या आरोपीने पोलिसांवर गोळ्या चालवल्या, त्याचं प्रत्युत्तर पोलिसांनी दिलं. तेव्हा विरोधक विचारु लागले पोलिसांनी आरोपीवर गोळ्या का झाडल्या? पोलिसांनी गोळ्या खायच्या का? विरोधी पक्ष म्हणजे डबल ढोलकी आहे. बदलापूरच्या घटनेत लहान मुलीवर अत्याचार झाले. त्याततल्या आरोपीची बाजू घेणारे हे विरोधक आहेत. त्यांनी आम्हाला कायदा आणि सुव्यवस्था शिकवू नये. तसंच बाबा सिद्दीकी यांच्यावर जो हल्ला झाला आणि त्यात त्यांना ठार करण्यात आलं त्या प्रकरणातल्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. सगळ्यांना फासावर लटकवणार ” अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे.

बाबा सिद्दीकींच्या पार्थिवावार १३ ऑक्टोबरला अंत्यसंस्कार

बाबा सिद्दीकी यांच्या पार्थिवावर रविवारी १३ ऑक्टोबरला अंत्यसंस्कार करण्यात आले. शासकीय इतमामात त्यांना अखेरचा निरोप देण्यात आला. या प्रकरणात गुरमेल सिंह आणि धर्मराज कश्यप यांना न्यायालयात हजर करण्यात आलं होतं. या दोघांना २१ ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.