गुरूवारी रात्री पालघरमधील एका गावात काही लोकांनी तीन साधूंना ठार मारल्याची घटना घडली होती. त्यानंतर दोन दिवसांनी त्या घटनेचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पोलिसांनी या प्रकरणी आरोपींना अटक केली असून, दोषींवर कडक कारवाई होईल असं आश्वासन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं आहे. तरीही या प्रकरणावरुन आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. विरोधी पक्षातील भाजप नेते राज्य सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करत आहे.
हरियाणाची भाजप नेता आणि कुस्तीपटू बबिता फोगटनेही महाराष्ट्रातील ठाकरे सरकारवर टीका केली आहे. पालघरमध्ये संतांची पोलिसांसमोर हत्या करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार झोपलं आहे का?? लाज वाटायला हवी…अशा आशयाचं ट्विट करत बबिताने राज्य सरकारवर टीका केली आहे.
#महाराष्ट्र के पालघर में संतों की पीट पीट कर हत्या.. वह भी पुलिस के सामने। उद्धव ठाकरे सरकार कहां सोई हुई है। शर्म आनी चाहिए।
सारे दोषी कैमरे के सामने हैं। दोषियों को सख्त से सख्त सजा मिलनी चाहिए।#moblynching #Palghar
— Babita Phogat (@BabitaPhogat) April 19, 2020
आणखी वाचा- पालघरमध्ये घडलेली घटना लांछनास्पद : उद्धव ठाकरे
दोषींवर कारवाई होणार – मुख्यमंत्री
“पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलीस कर्मचार्यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल,” अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यांनी ट्विटरवरून याप्रकरणी माहिती दिली. या घटनेचे व्हिडीओ समोर आल्यानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी उच्च स्तरीय चौकशीची मागणी केली होती.
