बेबी पाटणकर खंडाळा पोलिसांच्या ताब्यात

अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ साठय़ाचा उलगडा होणार आहे.

अमली पदार्थ साठय़ाच्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार बेबी पाटणकर हिला खंडाळा पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे धर्मराज काळोखेच्या कण्हेरी (ता खंडाळा) येथून जप्त करण्यात आलेल्या अमली पदार्थ साठय़ाचा उलगडा होणार आहे. या प्रकरणात खंडाळा न्यायालयाने बेबी पाटणकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
     कण्हेरी (ता खंडाळा) येथून मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील हवालदार धर्मराज काळोखे यांच्या घरी छापा टाकून सुमारे २२ कोटींचा ११२ किलो मॅफीडॉन या अमली पदार्थाचा साठा जप्त केला होता. यावेळी धर्मराज काळोखेच्या चौकशीत बेबी पाटणकर ही मुंबईतील महिला मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पुढे आली होती. हे प्रकरण उघडकीस आले तेव्हा पासून मुंबई व सातारा पोलिसांनी संयुक्त तपास मोहीम राबविली होती. बेबी पाटणकरला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मुंबई पोलिसांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर बेबी पाटणकरला सातारा पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वाईचे पोलीस उपअधीक्षक दीपक हुंबरे अधिक तपास करत आहेत. त्यांना एस.एस.गोडबोले, एस. टी बारेला आणि स्थानिक गुन्हे अन्वेशनचे भिसे व खंडाळा पोलीस अधिक तपास करत आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Baby patankar arrest in khandala