scorecardresearch

Premium

“घोडा मैदान समोर आहे, कोण…”, बच्चू कडूंचा रवी राणांना सूचक इशारा

बच्चू कडूंना आवर घालण्याचं विधान रवी राणांनी केलं होतं. याला बच्चू कडू यांनीही प्रत्युत्तर दिलं आहे.

bacchu_kadu_and_ravi_rana
रवी राणांनी केलेल्या विधानावर बच्चू कडूंनी प्रत्युत्तर दिलं आहे. ( संग्रहित छायाचित्र )

गेल्या दोन दिवसांपासून प्रहार संघटनेचे अध्यक्ष, आमदार बच्चू कडू आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्यात आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी सुरू आहेत. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे, अशी टीका रवी राणांनी केली होती. याला बच्चू कडू यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

“उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं अभय असल्यामुळे राणा दाम्पत्य काहीही वक्तव्य करतात. राणांना फडणवीसांनी आवर घातली पाहिजे,” असं विधान बच्चू कडू यांनी केलं होतं.

chandrashekhar bawankule (1)
“…भाजपाचे वरिष्ठ नेते फक्त तमाशा बघतात”, ‘त्या’ विधानावरून बावनकुळेंचा रोहित पवारांना इशारा, म्हणाले…
devendra fadnavis jayant patil
“फोडाफोडीचं राजकारण करणाऱ्यांना गणरायाने सुबुद्धी द्यावी”, जयंत पाटलांच्या विधानावर फडणवीस प्रत्युत्तर देत म्हणाले…
rahul narvekar eknath shinde uddhav thackrey
आमदार अपात्रता सुनावणी तीन आठवडे लांबणीवर; तात्काळ निर्णय देण्याची ठाकरे गटाची मागणी
Sharad Pawar and Chandrasekhar Bawankule
शरद पवार यांनी आरक्षणावर बोलू नये; बावनकुळे असे का म्हणाले…

हेही वाचा : राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेची निवडणूक महायुतीत लढणार? अजित पवार म्हणाले…

याला उत्तर देताना रवी राणा म्हणाले, “मी देवेंद्र फडणवीसांबरोबर ११-१२ वर्षापासून आहे. सुख आणि दु:खात एकत्र राहणारे व्यक्ती आम्ही आहोत. पळ काढणारे नाहीत. बच्चू कडू कधी इकडे कधी तिकडे असतात. त्यांनी सल्ला देण्याचं काम करू नये.”

हेही वाचा : तेलगी घोटाळ्याप्रकरणी छगन भुजबळांचं मोठं वक्तव्य, म्हणाले, “मी गृहमंत्री असताना…”

“बच्चू कडूंना आवर घालण्याची गरज”

“मला पाडण्यासाठी सर्व नेते निवडणुकीत एकत्र येतात. पण, जनता नेहमी माझ्याबरोबर असते. बच्चू कडूंना आवर घालण्याची गरज आहे. सरकारला ब्लॅकमेल करून काहीतरी मिळवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना आवर घालण्याची गरज आहे. आम्ही कधी मंत्रीपद, तिकीट किंवा कोणतं पद मागितलं नाही,” असं रवी राणांनी म्हटलं होतं.

“घोडा मैदान समोर आहे”

यावर आता बच्चू कडू यांनी राणांना सूचक इशारा दिला आहे. “घोडा मैदान समोर आहे. कोण काय करतं ते पाहूयात,” असं बच्चू कडू म्हणाले आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Bacchu kadu reply ravi rana over blackmail govt ministry allegation ssa

First published on: 17-09-2023 at 18:32 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×