प्रहारचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला. यानंतर आमदार रवी राणा यांनी या मतदारसंघातून नवनीत राणाच निवडणूक लढतील आणि मतदारसंघावर दावा करणारे बच्चू कडू त्यांच्या प्रचाराला येतील, असं वक्तव्य केलं. त्यावर आता बच्चू कडूंनी प्रत्युत्तर दिलं. तसेच यावेळी प्रहार राज्यात विधानसभेच्या १५ जागा लढवणार असल्याचंही जाहीर केलं. ते शनिवारी (२७ मे) अमरावतीत माध्यमांशी बोलत होते.

दरआठवड्याला वक्तव्यं बदलतात, भाजपाच्या आशीर्वादाने बच्चू कडूच नवनीत राणांच्या प्रचाराला येतील, या रवी राणांच्या वक्तव्यावर बच्चू कडू म्हणाले, “रवी राणांचा आशावाद चांगला आहे. मात्र, समोरची लढाई कशी लढायची हे आम्ही पाहू.”

kolhapur mla prakash awade, claim on hatkanangale lok sabha seat
“मी महायुतीचाच! मोदींना पंतप्रधान करण्यासाठी लढणार”, बंडखोर आमदार प्रकाश आवाडे यांचा पवित्रा
Brand Thackeray
ब्रँड ठाकरे, एकटा लढतो विचारे… उठा माझ्या सैनिकांनो पेटवा मशाली… ठाण्यासाठी रॅप गाणे
ramdas kadam shrikant shinde
“…तर मी राजकारणातून निवृत्त होईन”, ठाकरे गटाच्या ‘त्या’ टीकेवर रामदास कदमांचं प्रत्युत्तर; श्रीकांत शिंदेंच्या उमेदवारीबाबत म्हणाले…
Dhairyasheel Mane
मित्रपक्षांच्या नेत्यांची नाराजी दूर करण्याचे हातकणंगलेमध्ये खासदार धैर्यशील माने यांच्यासमोर आव्हान

“आम्ही १५ विधानसभा जागांची तयारी करतो आहे”

“आम्ही १५ विधानसभा जागांची तयारी करतो आहे. भुसावळ, जळगावमध्ये दोन जागा, नंदुरबार, सोलापूर, अमरावतीत तीन जागा, नागपूर एक जागा, अकोल्यात दोन जागा आणि वाशिक अशा एकूण १५ जागांची तयारी करतो आहे,” असं मत बच्चू कडूंनी व्यक्त केलं.

“अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी”

बच्चू कडू म्हणाले, “अमरावती लोकसभा निवडणुकीसाठी आमची पूर्ण तयारी झाली आहे. मागील लोकसभा निवडणुकी मी स्वतः अपक्ष लढलो होतो. तेव्हा कोणताही राजकीय पक्षाचा पाठिंबा नव्हता. असं असताना केवळ पाच हजार मतांनी पडलो होतो. त्याअनुषंगाने यंदाच्या लोकसभा निवडणुकीती आता आमची तयारी झाली आहे.”

हेही वाचा : VIDEO: पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील निती आयोगाच्या बैठकीला १० मुख्यमंत्री गैरहजर, एकनाथ शिंदे म्हणाले, “त्यांच्या…”

“अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे चांगला उमेदवार”

“अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी आमच्याकडे चांगला उमेदवार आहे. त्यामुळे जागेची मागणी करणं चुकीचं नाही. मागणी तर करायलाच पाहिजे. नंतर याला कसं सामोरं जायचं ते पाहू,” असं मत बच्चू कडू यांनी व्यक्त केलं.