अलिबाग : पार्थ पवारांच्या पुण्यातील जमीन प्रकरणी प्रहार जनशक्तीचे नेते बच्चू कडू यांनी महत्वाचं विधान केलं आहे. मोठ्यांना वेगळा न्याय आणि लहान लोकांना वेगळा न्याय असं झालं तर देशाचा नेपाळ व्हायला वेळ लागणार नाही अशी भीती बच्चु कडू यांनी व्यक्त केली आहे. अजित पवार यांच्या राजीनाम्याच्या मागणीचे त्यांनी समर्थन केले. ते अलिबाग येथे बोलत होते.
तेकायदा हा सर्वांना सारखा आहे हे देशाला सांगण्याची गरज आहे आणि सरकारने तसं वागणं गरजेचं आहे, असंही बच्चू कडू म्हणाले. पुणे जमीन प्रकरणी नैतिकता म्हणून अजित पवार यांनी राजीनामा द्यायला हवा असं मत प्रहारचे बच्चू कडू यांनी व्यक्त केलं आहे. अंजली दमानिया यांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे त्यावर ते अलिबाग येथे बोलत होते. आरोप होत असेल तर नैतिकता म्हणून राजीनामा देऊन समोर येणं गरजेचं आहे असं बच्चू कडू म्हणाले.
सरकारने कर्जमाफी करताना ती अधिक शेतकरयांपर्यंत कशी जाईल याचा विचार सरकारने करावा त्यासाठी जुन्या थकीत कर्जाला मुदतवाढ दिली पाहिजे आणि नवीन कर्ज देण्याचं धोरण आखलं पाहिजे नवीन कर्ज जर शेतकरयाला मिळालं नाही तर त्याची मोठी अडचण होणार आहे. सरकारने कर्जमाफी करताना याचा गांभीर्याने विचार करावा यासंदर्भातील प्रस्ताव लवकरच सरकारला दिला जाईल असे ही ते म्हणाले.
कर्जमाफीची रक्कम एप्रिल महिन्यात जिल्हा बँकेत जमा होणे गरजेचे आहे. कारण काही जिल्हा बँका थकीत कर्ज वसुल झाल्याशिवाय नवीन कर्ज देवू शकत नाही, ही बँकांची अडचण सरकारने समजून घेतली पाहिजे असं बच्चु कडू म्हणाले.
स्यावेळी त्यांनी निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेबद्दल वक्तव्य केले. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीत आम्ही लोकांसोबत असणार आहोत असं बच्चु कडू यांनी एका प्रश्नावर बोलताना सांगितले. स्थानिक पातळीवर कुणाशी युती करायची काय भूमिका घ्यायची याचे अधिका देण्यात आले आहेत. आम्ही बरेच दिवस आंदोलनात असल्याने आमची निवडणूकीच्या दृष्टीने तयारी झालेली नाही. त्यामुळे स्थानिक पातळीवर परीस्थिती बघून लढू. रायगड जिल्ह्यात देखील निवडणूका लढवण्याची आमची इच्छा आहे. जिल्हयात शेकापबरोबर आघाडी करण्यात आम्हाला काहीच अडचण नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
