अमरावती : महाविकास आघाडी सरकारमध्ये राज्यमंत्री राहिलेले अचलपूरचे आमदार बच्चू कडू यांना येथील जिल्हा सत्र न्यायालयाने सरकारी कामात अडथळा आणल्याच्या एका प्रकरणात २० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.

तत्कालीन आमदार बच्चू कडू यांनी ८ मे २००५ रोजी येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर घागर मोर्चाचे आयोजन केले होते. त्यावेळी विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक सुरू होती. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांना अडवले आणि नंतर बच्चू कडू यांना प्रवेशद्वारावर रोखले. यावेळी त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली. जिल्हा व सत्र न्यायालयाने बच्चू कडू यांना २० हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली.