scorecardresearch

मोठी बातमी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही; बच्चू कडूंचं सूचक विधान

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्ताराबाबत बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे.

मोठी बातमी: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणारच नाही; बच्चू कडूंचं सूचक विधान
फोटो- लोकसत्ता ग्राफिक्स टीम

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी बंडखोरी केल्यामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं आहे. यानंतर महाराष्ट्रात शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आलं. हे सरकार स्थापन होऊन सहा महिन्याहून अधिक कालावधी लोटला आहे. तरीही या सरकारचा अद्याप मंत्रीमंडळ विस्तार झाला नाही. सत्ताधारी पक्षातील नेत्यांकडून दररोज मंत्रीमंडळ विस्ताराच्या नवनवीन तारखा दिल्या जात आहेत.

अशी एकंदरीत राजकीय स्थिती असताना शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा देणारे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. शिंदे फडणवीस सरकारच्या या कार्यकालात मंत्रीमंडळ विस्तार होणारच नाही, अशा प्रकारचं सूचक विधान बच्चू कडू यांनी केलं. आपण जेव्हा सत्ताधारी पक्षातील आमदारांशी बोलत असतो, तेव्हा २०२४ नंतरच मंत्रीमंडळ विस्तार होईल, असं सांगत असतो, असंही बच्चू कडू म्हणाले. ते ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीशी बोलत होते.

हेही वाचा- VIDEO: “आम्ही पुरुष दररोज लैंगिक संबंध ठेवतो, पण…”, भरमंचावरून नितीश कुमारांचं विधान

दिव्यांग मंत्रालयाचं मत्रीपद तुमच्याकडे कधी येणार आहे? असं विचारलं असता बच्चू कडू म्हणाले, “मला वाटतं, हा प्रश्न तुम्ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना विचारायला हवा. आम्ही सर्व आमदार जेव्हा एकत्र बसत असतो. तेव्हा मी त्यांना सांगत असतो की, २०२४ नंतरच आपल्या मंत्रिमंडळाचा विस्तार होईल,” असं सूचक विधान बच्चू कडूंनी केलं.

हेही वाचा- “सगळे घाव झेलायला ताई आणि मलाई खायला…”, पंकजा मुंडेंबाबत प्रीतम मुंडेंचं मोठं विधान!

‘मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होईल’ या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या विधानाबाबत विचारलं असता बच्चू कडू मिश्किलपणे म्हणाले की, “एवढ्यात मंत्रीमंडळ विस्तार झाला तर आम्ही तुम्हाला पेढे भरवू…. पण आम्ही सगळ्या आमदारांनी आता आमची मानसिकता तयार करून ठेवली आहे. मंत्रीमंडळ विस्तारात तुम्ही डोकं नका लावू, काहीतरी काम करा,” असंही बच्चू कडू म्हणाले.

मराठीतील सर्व महाराष्ट्र ( Maharashtra ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 09-01-2023 at 22:08 IST

संबंधित बातम्या