Badlapur Sex Assault : बदलापूरमधल्या नामांकित शाळेत दोन चिमुरड्या मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचा धक्कादायक प्रकार १३ ऑगस्टला घडला. या प्रकरणात आरोपी अक्षय शिंदे अटक करण्यात आली. या प्रकरणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी SIT स्थापन करण्याचे आदेश दिले होते. या विशेष तपास समितीने (SIT) बदलापूरच्या शाळा प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. Pocso Act च्या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

नेमकी घटना काय घडली?

बदलापूर येथील नामांकित शाळेत जाणाऱ्या दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार (Badlapur sexual assault ) करण्यात आला. शाळेतला सफाई कर्मचारी अक्षय शिंदे याने हे अत्यंत घृणास्पद कृत्य (Badlapur sexual assault ) केलं. दरम्यान या घटनेचा उद्रेक बदलापूरमध्ये २० ऑगस्टच्या दिवशी पाहण्यास मिळाला. बदलापूरमध्ये रेल रोको आंदोलन करत आंदोलकांनी सुमारे ९ तास लोकल सेवा ठप्प केली होती. आता या प्रकरणी एसआयटीने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाची दखल मुंबई उच्च न्यायालयाने घेतली आहे. शाळेतली विद्यार्थ्यांची सुरक्षा ही शाळेची जबाबदारी नाही का? या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद करुन घ्यायला इतका वेळ का लावला हे प्रश्न कोर्टाने उपस्थित केले आहेत. आता एसआयटीने शाळेवर गुन्हा दाखल केला आहे.

Attention of Navi Mumbai people to the decision to abolish CIDCO transfer fee
सिडको हस्तांतरण शुल्क रद्द करण्याच्या निर्णयाकडे नवी मुंबईकरांचे लक्ष
10th October Rashi Bhavishya In Martahi
१० ऑक्टोबर पंचांग: गुरुची वक्री चाल तर महागौरी…
High Court asked the state if there's evidence against Saurabh Tripathi and Ashutosh Mishra
अंगाडिया खंडणी प्रकरण : IPS अधिकरी सौरभ त्रिपाठींविरोधात पुरावे आहेत का? उच्च न्यायालयाचा सरकारला प्रश्न
ram jhula hit and run case
“तांत्रिक कारणांमुळे न्याय पराभूत होता कामा नये”, रितू मालू प्रकरणी सत्र न्यायालय म्हणाले…
navi mumbai police registered case under pocso act against youth for child sexual abuse
नवी मुंबई : बाल लैंगिक अत्याचारप्रकरणी तरुणावर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा
Satyashodhan Committee, High Court slams central government, amendment of law,
केंद्र सरकारला उच्च न्यायालयाचा तडाखा, सत्यशोधन समिती स्थापन करण्याबाबतची कायदादुरूस्ती घटनाबाह्य ठरवून रद्द
Controversial statement case High Court orders Thane Magistrate in case against Jitendra Awhad
वादग्रस्त वक्तव्याचे प्रकरण: जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा नोंदवण्याच्या मागणीचा पुनर्विचार करा,उच्च न्यायालयाचे ठाणे न्यायदंडाधिकाऱ्यांना आदेश
Ajit Pawar former corporator Vinod Jaywant Nadhe shot from a pistol
अजित पवारांच्या माजी नगरसेवकाच्या पिस्तूलातून गंमतीत गोळीबार; माजी नगरसेवकासह दोघांना अटक
protest against Badlapur School Sexual Abuse Case
बदलापूर रेल्वे स्थानकावरील आंदोलन

काय म्हटलं आहे एसआयटीने?

एसआयटीने हे म्हटलं आहे की शाळा प्रशासनाने या प्रकरणाची माहिती मिळूनही पोलीस तक्रार केली नाही. पीडित मुलीच्या पालकांनी शाळेशी संपर्क केला होता. तरीही शाळेने योग्य पावलं उचलली नाहीत. एसआयडीने पॉक्सो कायद्याच्या २१ व्या सूचीनुसार हा गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये लहान मुलाविरोधातला गुन्हा ठाऊक झाल्यानंतर त्यासंदर्भात कुणीही तक्रार करु शकतं. ती न केल्यास या सूची अंतर्गत गुन्हा दाखल होतो. या प्रकरणात शाळेने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत बदलापूरकरांनी कारवाईची मागणी केली होती. तसंच स्थानिक नेते आणि विरोधी पक्षातील नेत्यांनीही मागणी केली होती. ज्यानंतर आता एसआयटीने हे पाऊल उचललं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.

हे पण वाचा- Raj Thackeray : राज्यातील महिला अत्याचाराच्या घटनांवरून राज ठाकरे संतप्त; म्हणाले, “आज शिवाजी महाराज असते, तर…”

पालकांचा आरोप काय?

शाळा प्रशासनाने आम्ही दाखवलेला अहवाल फेटाळला. त्यानंतर आम्ही तक्रार नोंदविण्यासाठी पोलीस ठाण्यात गेलो. तिथे आमच्या तक्रारीची दखल घेतली गेली नाही. तक्रार दाखल करून घेण्यासाठी पोलिसांनी १२ तास लावले. बदलापूर प्रकरणात मनसे नेत्यांनी मध्यस्थी केल्यानंतर पोलिसांकडून गुन्हा नोंदवण्यात आला. पोलिसांनी आपल्या वक्तव्यात अनेक बदल केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तसेच काही पोलीस अधिकाऱ्यांनी धमकावून कोणत्याही आंदोलनात सहभागी होऊ नये, असा इशारा दिल्याचाही पालकांचा आरोप आहे. याच बरोबर आणखी एक आरोप पालकांनी केला आहे.