Badlapur Sexual Assult Case : बदलापूर येथील शाळेत झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी गोळीबारात मारल्याचा तपास हलक्यात घेतल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी राज्य गुन्हे अन्वेषण विभगाला (सीआयडी) चांगलेच फटकारले. न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. टाईम्स ऑफ इंडियाने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

संशयित आरोपी अक्षय शिंदे (२४) याला ऑगस्टमध्ये अटक करण्यात आली होती. २४ सप्टेंबर रोजी पोलिसांच्या गोळीबारात त्याचा मृत्यू झाला. स्थानिक पोलिसांकडून प्रकरणे सीआयडीकडे हस्तांतरित केली जातात. तपासातील काही त्रुटी आणि आरोपीच्या मृत्यूची चौकशी करणाऱ्या दंडाधिकाऱ्यांना सादर केलेली कागदपत्रे लक्षात आल्यानंतर हायकोर्टाने नाराजी केली.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Image Of Walmik Karad
Walmik Karad : वाल्मिक कराडवर मकोका लावल्यानंतर परळीत तरुणीकडून आत्मदहनाचा प्रयत्न
Santosh Deshmukh murder case, Santosh Deshmukh murder,
संतोष देशमुख हत्या प्रकरण; नवीन एसआयटी
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
forest minister ganesh naik slams eknath shinde working style during cm tenure
शिंदेशाहीतील चुकांची उजळणी करत नाईकांचे वर्चस्वाचे संकेत

हेही वाचा >> Deepak Kesarkar : शपथविधी कार्यक्रमाच्या तयारीला वेग; भाजपाकडून पाहणी, शिवसेनेत नाराजी? नेते म्हणाले, “मोठा भाऊ…”

“राज्य सीआयडीकडून हे प्रकरण इतक्या हलक्यात कसं घेतलं जाऊ शकतं? हा मुद्दा कोठडीतील मृत्यूशी संबंधित आहे. तुमच्याकडून काय अपेक्षा होती, आता तुमच्याकडून काय अपेक्षा करायची?” असा सवालही उच्च न्यायालयाने विचारला.

वैद्यकीय कागदपत्रे का जमा केली नाहीत?

खंडपीठाने म्हटलंय की, “तुमच्या वागण्यामुळे तुम्ही स्वतःवरच संशय निर्माण करत आहात. तुम्ही कोणती चौकशी करत आहात? असंही न्यायालयाने विचारलं. या प्रकरणी संबंधित वैद्यकीय कागदपत्रे का जमा केली नाहीत?” असा सवालही खंडपीठाने केला.

सीआयडी माहिती नीट का गोळा करत नाही आणि आम्हाला त्याची चाचणी घेण्याची सक्ती का केली जात आहे? आता आमच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. वैद्यकीय कागदपत्रे गोळा केली जात नाहीत. तुम्ही मुद्दाम दंडाधिकाऱ्यांकडून माहिती रोखण्याचा प्रयत्न करत आहात का? हाच निष्कर्ष आम्ही काढत आहोत, असं न्यायालयाने फटकारलं.

योग्य अहवालाकरता कागदपत्रे द्या

योग्य चौकशी होण्याकरता आणि अहवाल सादर करण्यासाठी सर्व कागदपत्रे गोळा करून दंडाधिकाऱ्याना सादर केली जातील, याची खात्री करण्याचा प्रयत्न असल्याचेही खंडपीठाने म्हटलं. या प्रकरणाचा योग्य तपास करा आणि सर्व विधाने दंडाधिकाऱ्यांना योग्यरित्या सादर करा. तरच दंडाधिकारी योग्य अहवाल तयार करू शकतील, असं खंडपीठाने स्पष्ट केलं.

न्यायालायने या प्रकरणी पुढील सुनावणी २० जानेवारी २०२५ रोजी ठेवली आहे. या वेळी दंडाधिकाऱ्यांनी न्यायालयात अहवाल सादर करायचा आहे.

Story img Loader