केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर वादग्रस्त विधान केल्यामुळे राज्यात वातावरण चांगलेच तापले होते. शिवसेनेने नारायण राणे यांच्या विरोधात आक्रमक भुमिका घेतल्याचे पडसाद राज्यात अनेक ठिकाणी उमटले. अनेक ठिकाणी शिवसेना – भाजप नेते आमने सामने आले. राज्यात अनेक ठिकाणी आंदोलनं करण्यात आली या आंदोलनात आज नारायण राणे यांना महाडच्या न्यायालयात हजर करण्यात आले होते.  तसेच राणे यांना महाडच्या न्यायालयाने जामीन मंजूर केला.

राणे यांच्या वकिलांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत न्यायालयाकडे जामीनासाठी अहवान केले होते. 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर नारायण राणे यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. भविष्यात आशी वक्तव्य कधीच करणार नाही आशी हमी न्यायालयाने राणे यांच्याकडून लेखी कागदोपत्री लिहून घेतल्याचे समजत आहे. तरी सुद्धा पोलिसांनी राणे यांना सात दिवसाची पोलिस कोठडी ची मागणी केली होती. नारायण राणे यांना अटक करण्यापुर्वी पोलिसांनी कोणतीही पूर्व सुचना दिली नव्हती.

 

नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेले वादग्रस्त वक्तव्यामुळे पुणे, रायगड, नाशिक या ठिकाणी पोलिसांकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. नारायण राणे यांच्या विरोधात अनेक ठिकाणी निदर्शेने करण्यात आली. राणे यांच्या वादग्रस्त विधानामुळे अनेक ठिकाणी तोडफोडी च्या घटना घडल्या. तसेच पोलिस ,भाजप तसेच शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचे चित्र दिसून आले आहे.