BMC Mumbai Mayor Updates: महाराष्ट्रात सध्या कोणत्या महानगरपालिकेत कुणाच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडणार? याची जोरदार चर्चा रंगल्याचं पाहायला मिळत आहे. महापौरपदासाठीच्या आरक्षणाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून त्यानुसार संबंधित महानगरपालिकांमध्ये त्या त्या वर्गातील उमेदवारांची चाचपणी केली जात आहे. मुंबई महानगरपालिकेत खुल्या प्रवर्गातील महिला आरक्षण महापौरपदासाठी पडलं असून त्यानुसार संभाव्य उमेदवारांची चाचपणी चालू असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दावोसहून परतल्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरेंच्या जन्मशताब्दीनिमित्त राजकीय, सामाजिक वर्तुळातून त्यांना अभिवादन केलं जात आहे.
Live Updates
Maharashtra Mayor Election Live Updates: महानगरपालिकांमधील महापौरपदाची सोडत, महिलांसाठीचं आरक्षण आणि संभाव्य उमेदवार...
नागपूर : आंबेडकर भवन त्याच जागेवर बांधा …अन्यथा… बावनकुळे संतापले
नागपूरच्या अंबाझरी उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्यावरून वाद पेटला असून, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी तेच भवन त्याच जागेवर तातडीने बांधण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा आंदोलन आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा इशारा दिला आहे. ...अधिक वाचा
अमेरिकी रेग्युलेटरचे समन्स अन अदानी समूहाचे शेअर्स धडाम!
अमेरिकेच्या गुंतवणूकदारांची दिशाभूल केल्याचा आरोप फेटाळला असला तरी जागतिक स्तरावरील नियामक घडामोडींमुळे अदानी समूहाच्या मार्केट कॅपला एकाच दिवसात मोठा फटका बसला आहे. ...सविस्तर वाचा
BMC Mayor : कोणत्याही प्रवर्गातील महिला होऊ शकणार महापौर; भाजपमध्ये सर्वाधिक ४९ महिला नगरसेविका…
देशातील सर्वात श्रीमंत महापालिकेच्या चाव्या आता पुन्हा एकदा महिलांकडे जाणार असून आरक्षण सोडतीने भाजपमधील अनुभवी महिला नगरसेविकांच्या आशा पल्लवित केल्या आहेत. ...वाचा सविस्तर
Tukaram Mundhe : एसटीचा प्रवास अन् बनावट ओळखपत्र? सावधान! तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर...
अकोल्यात सत्तास्थापनेची चुरस - ॲड.प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात विरोधकांची एकत्रित मोट; भाजपचा बहुमताचा दावा
अकोला महापालिकेत त्रिशंकू स्थिती निर्माण झाल्याने सत्तास्थापनेची चुरस वाढली आहे. भाजपने बहुमताचा दावा केला असून, ॲड. प्रकाश आंबेडकरांच्या नेतृत्वात सर्व विरोधक एकत्र येत महापौरपदासाठी तयारी करत आहेत. ...अधिक वाचा
"अंगणवाडीतील पोषण आहारात केळीचा समावेश…", मंत्री गुलाबराव पाटील...
जळगाव जिल्ह्यातील केळी उत्पादनाला बाजारपेठ मिळवून देण्यासाठी अंगणवाडीतील पोषण आहारात केळीचा समावेश करण्याचा महत्त्वपूर्ण पाठपुरावा राज्य सरकार करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. ...सविस्तर वाचा
TMC Water Supply : ठाण्यात २० टक्के पाणी कपात; पुढील १२ दिवस टप्प्याटप्प्याने विविध भागांच्या कपातीचे नियोजन…
ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठ्यात २० टक्के कपात लागू होणार असून शहरातील विविध भागांचा पुरवठा एक-एक दिवस बंद ठेवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ...सविस्तर वाचा
नालासोपाऱ्यात बेकायदेशीर गर्भपात केंद्र व औषध विक्रीचा प्रकार; तीन डॉक्टरांवर पालिकेने केला गुन्हा दाखल...
नालासोपाऱ्यात कोणत्याही परवान्याशिवाय बेकायदेशीर गर्भपात केंद्र चालवणाऱ्या आणि गर्भपाताच्या औषधांची विक्री करणाऱ्या तीन डॉक्टरांविरुद्ध वसई-विरार महापालिकेने आचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. ...वाचा सविस्तर
Tejas Express : कोकणातील तेजस एक्सप्रेसमधील प्रवासी हैराण; अवेळी प्रवास, प्रवासात गैरसोय…
उच्च श्रेणीची सेवा देण्याचे आश्वासन देणारी तेजस एक्स्प्रेस सध्या दर्जाहीन आणि वेळखाऊ ठरत असल्याचा आरोप प्रवासी संघटनांनी केला असून रेल्वे मंडळाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे. ...वाचा सविस्तर
बिबट्याने केली वासराची शिकार, हिरापूर परिसरात दहशतीचे सावट, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
अमरावती जिल्ह्यातील हिरापूर परिसरात बिबट्याने गोठ्यात घुसून गायीच्या वासराची शिकार केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व मजुरांमध्ये भीती पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची जोरदार मागणी होत आहे. ...वाचा सविस्तर
बिबट्याने केली वासराची शिकार, हिरापूर परिसरात दहशतीचे सावट, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी
अमरावती जिल्ह्यातील हिरापूर परिसरात बिबट्याने गोठ्यात घुसून गायीच्या वासराची शिकार केल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी व मजुरांमध्ये भीती पसरली असून, बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची जोरदार मागणी होत आहे. ...वाचा सविस्तर
CM Devendra Fadnavis : कल्याण-डोंबिवलीतील मनसे-शिंदे सेनेच्या युतीवर फडणवीसांचं भाष्य; म्हणाले, "मुंबईत…"
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत मनसेच्या ५ नगरसेवकांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. ...वाचा सविस्तर
अनिल कोकीळ यांच्याकडची जबाबदारी सुषमा अंधारे यांच्याकडे; उद्धव ठाकरे यांनी घेतला निर्णय...
लालबागचे माजी नगरसेवक अनिल कोकीळ यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख पदाची महत्त्वाची जबाबदारी शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांच्याकडे सोपवली आहे. ...वाचा सविस्तर
अखेर मिरा-भाईंदरमध्ये राजकीय पक्षांचे गटनेते निश्चित; सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा, शिवसेना-काँग्रेस एकत्र…
महापौरपद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने भाजपमध्ये इच्छुकांची चुरस वाढली असून पुढील आठवड्यात शहराला नवीन 'प्रथम नागरिक' मिळणार असल्याचे निश्चित झाले आहे. ...सविस्तर वाचा
ठाण्याच्या महापौर कुणाचा? भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणाले…
ठाणे महापालिकेत शिवसेना शिंदे गटाला बहुमत मिळाले असले तरी युतीधर्म पाळून भाजपला सत्तेत यथोचित सन्मान आणि महापौरपद मिळावे अशी मागणी जिल्हाध्यक्ष संदीप लेले यांनी केली आहे. ...सविस्तर बातमी
MSRTC Tirthatan Scheme : एसटी महामंडळातर्फे धार्मिक पर्यटनाची सुवर्णसंधी; 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे - एसटी संगे तीर्थाटन' योजना…
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या १०० व्या जयंतीनिमित्त एसटी महामंडळाने अष्टविनायक, शिर्डी आणि शेगावसह विविध तीर्थक्षेत्रांसाठी परवडणाऱ्या दरात विशेष सहल योजना सुरू केली आहे. ...सविस्तर बातमी
सांगली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत नेत्याच्या फोटोवर काळी जादू
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिवंगत नेत्याच्या फोटोवर काळी जादू केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे अंधश्रद्धा आणि राजकारणावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. ...सविस्तर वाचा
Maharashtra Sadan Scam: छगन भुजबळांची मुलगा व पुतण्यासह महाराष्ट्र सदन घोटाळाप्रकरणी निर्दोष मुक्तता
Chhagan Bhujbal ED Case Discharge: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) मंत्री छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणात त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. ...सविस्तर बातमी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच फरार आरोपींचे पोलिसांसमोर आत्मसमर्पण….महाड नगरपालिका निवडणूक राडा प्रकरण
महाड नगरपालिका निवडणूक मतदानावेळी झालेल्या राडा प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पाच फरार कार्यकर्त्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे. न्यायालयाच्या कठोर भूमिकेनंतर अखेर सर्व आरोपी हजर झाले आहेत. ...सविस्तर वाचा
शाळा प्रशासन चौकशीच्या फेऱ्यात, व्हॅन वाहतूकही रडारवर; बदलापूर अत्याचार प्रकरणात बाल हक्क आयोगाकडून चौकशीचे आदेश…
बाल हक्क आयोगाने या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले असून विनापरवाना शालेय वाहतूक करणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाईसह फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. ...वाचा सविस्तर
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे हप्ते रखडले… अंगणवाडी सेविका बजावणार मुख्य भूमिका
तांत्रिक अडचणींमुळे अनेक लाभार्थी महिलांचे १५०० रुपये बँक खात्यात जमा झाले नसून अंगणवाडी सेविकांच्या मदतीने ही प्रक्रिया सुलभ करून लाभार्थ्यांची अडचण दूर केली जाणार आहे. ...सविस्तर वाचा
रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाला धमकावून लुटले- बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरातील घटना
पुण्यातील बंडगार्डन मेट्रो स्थानक परिसरात रिक्षाचालकाने प्रवासी तरुणाला धमकावून रोकड व मोबाइलसह २३ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लुटल्याची घटना घडली असून, कोरेगाव पार्क पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. ...सविस्तर वाचा
ठाणेकरांना २० हजार वर्षांपूर्वीची मानव कला पाहण्याची संधी
मानवाने धातूचा शोध लागण्यापूर्वी दगडी हत्यारांच्या साहाय्याने मऊ खडकावर कोरलेली ही दुर्मिळ कातळ शिल्पे प्रत्यक्ष पाहण्याची सुवर्णसंधी ठाणेकरांना २६ जानेवारीपर्यंत उपलब्ध आहे. ...सविस्तर वाचा
नंदुरबारमध्ये गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना विशेष मान… कारण काय?
माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यानंतर अजित पवारांच्या कोट्यातील या जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्याला निमंत्रित केल्याने महायुतीमधील अंतर्गत सत्तासमीकरणे बदलण्याची शक्यता वर्तविली जात आहे. ...वाचा सविस्तर
शेतीमाल निर्यातीत गुंतवणुकीच्या आमिषाने फसवणूक करणारा अटकेत
शेतीमाल निर्यातीत गुंतवणुकीच्या आमिषाने ठेवीदारांची तब्बल १५ कोटी रुपयांची फसवणूक करणाऱ्या समर्थ क्रॉप केअर कंपनीच्या संचालकाला आर्थिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. फसवणुकीची व्याप्ती वाढण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. ...वाचा सविस्तर
Vasai Virar Mayor Election : महापौरासह पदाधिकाऱ्यांच्या स्वागताची तयारी
महापौर पदाचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी जाहीर झाल्याने पालिकेत नव्या महापौरांच्या स्वागतासाठी दालन आणि सभागृहाचे नूतनीकरण तसेच इतर सोयीसुविधांची अतिरिक्त आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. ...सविस्तर वाचा
मोठी बातमी… नागपुरातील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराकडून तरुणीची निर्घृण हत्या, प्रेमातील वादाचा परिणाम…
नागपूरमधील ओयो हॉटेलमध्ये प्रियकराने तरुणीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रेमातील वादातून हा प्रकार घडल्याने शहरात खळबळ उडाली असून आरोपीचा शोध सुरू आहे. ...अधिक वाचा
नर्सिंग अभ्यासक्रम प्रवेशाची बिकट स्थिती… सात महाविद्यालयात शून्य प्रवेश…
राज्यात बीएस्सी नर्सिंग अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेत गंभीर स्थिती समोर आली आहे. सात महाविद्यालयांमध्ये एकही प्रवेश झाला नसून, ५ हजारांहून अधिक जागा रिक्त राहिल्या आहेत. ...अधिक वाचा
मनसेचा सन्मान राखत, कल्याण डोंबिवलीत महायुतीचाच महापौर; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण…
कल्याण-डोंबिवलीत मनसेचा योग्य सन्मान राखला जाईल आणि महायुतीचाच महापौर बसेल, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देत भाजपसोबतच्या वादाच्या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. ...अधिक वाचा
भिवंडीत काँग्रेसच्या सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग; बहुमतासाठी काँग्रेस घेणार…
त्रिशंकू अवस्थेतील भिवंडी पालिकेत सत्ता राखण्यासाठी काँग्रेसने मित्रपक्षांशी जुळवाजुळव सुरू केली असून भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीच्या धर्तीवर नव्या समीकरणांची बांधणी केली जात आहे. ...सविस्तर बातमी
Maharashtra Mayor Election Live Updates: महापौर निवडणूक लाईव्ह अपडेट्स...
