खरी शिवसेना कोणाची यावरून अस्तित्वाची लढाई सुरु झाली आहे. त्याचा निकाल निवडणूक आयोगाच्या आधी आज ( ५ सप्टेंबर ) शिवसेना विरुद्ध शिंदे गटाने केलेल्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने जनतेच्या दरबारात लागेल. शिंदे गटाने बीकेसी मैदानावरील मेळाव्यासाठी जोरदार तयारी केली आहे. त्यातच आता या मेळाव्याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे थोरले पुत्र जयदेव ठाकरेंनी हजेरी लावल्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मागील काही दिवसांपासून जयदेव ठाकरेही शिंदे गटात दाखल होणार असल्याच्या चर्चा होत्या. त्यावरही जयदेव ठाकरेंनी स्पष्टीकरण दिलं आहे. “बीकेसी मैदानावर आलो आहे. ठाकरे कधी लिखीत घेऊन येत नाहीत. हा ठाकरे कोणाच्या गोठ्यात बांधला जात नाही. एकनाथ शिंदेंनी दोन चार भूमिका घेतलेल्या मला आवडल्या. त्यांच्यासारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवा आहे.”

हेही वाचा – “…तेव्हा इंदिरा गांधींनी कधीच म्हटलं नाही की माझा बाप चोरला” राहुल शेवाळेंचं उद्धव ठाकरेंवर टीकास्र!

“चिपळ्या वाजवणारा एकनाथांना जवळच्यांनी संपवलं. तसेच, ‘एकनाथला एकटानाथ’ होऊन देऊ नका, ही तुम्हाला विनंती आहे. एकनाथ शिंदे गोरगरीब आणि शेतकऱ्यांची कामे करत आहेत. शेतकरी राबतो म्हणून दोन दाने आपल्या पोटात जातात. एकनाथ शिंदे हे राबकरी, कष्टकरी आणि मेहनत करणारे असून, त्यांना दुरावा देऊन नका. राज्यातील विधानसभा बरखास्त करा, परत निवडणूक घ्या आणि शिंदेराज्य येऊद्या,” अशी मागणी जयदेव ठाकरे यांनी केली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb thackeray son jaydev thackeray attends eknath shinde bkc dasara melava ssa
First published on: 05-10-2022 at 20:24 IST