सोलापूर : कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सोलापूरसह अक्कलकोट आणि जत तालुक्यातील गावांवर दावा सांगितल्यानंतर महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला असताना तिकडे कर्नाटकात कन्नड रक्षण वेदिके संघटनेने महाराष्ट्रातील वाहनांवर दगफेक करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळाही जाळला. त्यास प्रत्युत्तर म्हणून सोलापुरात बाळासाहेबांची शिवसेना युवा शाखेने कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा पुतळा जाळून संताप व्यक्त केला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील मराठी भागात काही गावांमध्ये कर्नाटकधार्जिण्या मंडळींकडून वातावरण पेटविण्याचा प्रयत्न होत आहे. काही गावांना कर्नाटकात विलीन होण्याची मागणी करण्यासाठी जाणीवपूर्वक फूस लावली जात आहे. दुसरीकडे कर्नाटकात महाराष्ट्रातील वाहनांवर दगडफेक करून नुकसान केले जात आहे. कन्नड वेदिके रक्षण संघटनेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पुतळा जाळण्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे सोलापुरात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे युवा जिल्हाप्रमुख सागर शितोळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी कन्नड रक्षण  वेदिके संघटनेला जशास तसे उत्तर देण्यासाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री बोम्मई यांचा पुतळा जाळून त्यांच्या विरोधात निदर्शने केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Balasaheb yuva sena burnt effigy of karnataka chief minister in solapur ysh
First published on: 09-12-2022 at 22:50 IST