सावंतवाडी : सावंतवाडी न्यायालयाच्या आवारातून पळून गेलेला बांग्लादेशी शांतो सरकार या आरोपीला इन्सुली येथील तपासणी नाक्यावर ताब्यात घेण्यात आले आहे. सावंतवाडी येथील न्यायालयातून बांग्लादेशी आरोपी पळून गेला आहे. शौचालयाला जातो असे सांगून त्याने पोलिसांना चकवा दिला. ही घटना आज शनिवारी सायंकाळी घडली. आणखी वाचा-चिपळूणमधील बनावट नोटा प्रकरण रत्नागिरीपर्यंत पोहोचले; आणखी एक जण ताब्यात आरोपीला शोधण्यासाठी सावंतवाडी पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली. याबाबतची माहिती सावंतवाडी पोलीस ठाण्यातून देण्यात आली. आपण शौचालयाला जातो असे सांगून तो न्यायालयाच्या आवरात गेला, असे पोलिसांचे म्हणणे आहे. सिंधुदुर्ग पोलीसांनी नाकाबंदी केली. त्यामुळे त्याला इन्सुली तपासणी नाक्यावर शिताफीने ताब्यात घेण्यात आले आहे.