पुढील महिन्यात सात दिवस बँका बंद; १० ते १२ सप्टेंबर सलग तीन दिवस टाळं

सप्टेंबर महिन्यात बँकांना शनिवार आणि रविवार मिळून एकूण ७ दिवसांची सुट्टी असणार आहे. जाणून घेऊया, हे दिवस कोणते आहेत?

Bank Holiday September Month Banks Closed for 7 Days gst 97
सप्टेंबर महिन्यात 'हे' सात दिवस बँका बंद असणार आहेत.

सप्टेंबर महिना सुरु व्हायला अवघे दोन दिवस शिल्लक आहेत. विशेषतः बँकेच्या कामांसाठी तुम्हाला हा महिना महत्त्वाचा ठरेल. तुमची बँकेची कोणती काम खोळंबली असतील तर येत्या म्हणजेच सप्टेंबर महिन्यामध्ये तुम्हाला तुमची ही कामं पूर्ण करता येणार आहे. कारण ऑगस्टच्या तुलनेत सप्टेंबर महिन्यामध्ये बँकांना कमी दिवस सुट्ट्या असतील. भारतीय रिझर्व्ह बँकेच्या (RBI) सुट्ट्यांच्या अधिकृत कॅलेंडरनुसार, सप्टेंबरमध्ये बँकेना एकूण ७ दिवस सुट्टी असणार आहे. यानुसार, सप्टेंबर महिन्यात बँकांना शनिवार आणि रविवार मिळून एकूण ७ दिवसांची सुट्टी असणार आहे.

सप्टेंबर महिन्यात बँकांना असणाऱ्या या ७ सात दिवसांच्या सुट्यापैकी ३ सुट्ट्या सलग असणार आहेत. १० सप्टेंबर, ११ सप्टेंबर आणि १२ सप्टेंबर असं सलग तीन दिवस बँका बंद असणार आहेत. त्यामुळे, अत्यंत महत्त्वाची काही कामं असतील तर ती शक्यतो १० तारखेच्या आधीच करा. कारण, १० तारखेला गणेश चतुर्थी, ११ सप्टेंबर रोजी दुसरा शनिवार तर १२ सप्टेंबरला रविवार आल्यानं बँकांना ३ दिवसांची सुट्टी मिळाली आहे.

RBI कडून राज्यनिहाय पारंपरिक सण उत्सव, धार्मिक तसेच अन्य महत्त्वाच्या दिवशी या सुट्ट्या जाहीर केल्या जातात. त्याप्रमाणे, सप्टेंबर महिन्यातील बँकांच्या सुट्ट्या ‘Holiday under Negotiable Instruments Act’ अंतर्गत ठरवण्यात आल्या आहेत. दरम्यान, देशभरातील बँकांना त्या-त्या राज्यांच्या सणावारांनुसार सुट्ट्या दिल्या जातात. म्हणजेच, आठवड्याच्या सुट्ट्या वगळता (शनिवार, रविवार) RBI ने दिलेल्या अन्य सुट्ट्या देशातील सगळ्याच बँकांना लागू असतील असं नाही.

सप्टेंबर महिन्यात ‘हे’ सात दिवस बँका असणार बंद

  • ५ सप्टेंबर : रविवार
  • १० सप्टेंबर : गणेश चतुर्थी
  • ११ सप्टेंबर : दुसरा शनिवार
  • १२ सप्टेंबर : रविवार
  • १९ सप्टेंबर : रविवार
  • २५ सप्टेंबर : चौथा शनिवार
  • २६ सप्टेंबर : रविवार

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Bank holiday september month banks closed for 7 days gst