सोलापूर : बँकेच्या आर्थिक कामकाजाची वेळ संपल्यानंतर बँक बंद केली असतानाही संतापलेल्या बँक खातेदाराने बँकेला बाहेरून टाळे ठोकले. यामुळे बँक कर्मचाऱ्यांना तब्बल दोन तास बँकेतच अडकून बसावे लागले. उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथे बँक ऑफ बडोदाच्या शाखेत हा प्रकार घडला. याप्रकरणी बँक प्रशासनाच्या फिर्यादीनुसार संबंधित ग्राहकाविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
तानाजी नामदेव दरेकर (वय ४५, रा. काटी सावरगाव, ता. तुळजापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या बँक ग्राहकाचे नाव आहे. याबाबत बँकेचे शाखाधिकारी आदित्य गणपती अकेला यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार तानाजी दरेकर हे या बँकेचे ग्राहक आहेत. दुपारी साडेचार वाजता ते बँकेत आर्थिक व्यवहारासाठी आले असता त्यांना बँक कर्मचाऱ्यांनी, बँकेच्या आर्थिक कामकाजाची वेळ संपली आहे, तुम्ही उद्या या, असे सांगितले. परंतु दरेकर यांनी बँकेतील आर्थिक व्यवहाराची तीव्र निकड असल्यामुळे तशी विनंती केली. परंतु बँक बंद होत असल्याचे कारण देत त्यांना पिटाळून लावण्यात आले.
तथापि, या घटनेमुळे मनस्ताप झालेल्या तानाजी दरेकर यांनी बँक प्रशासनाला धडा शिकविण्याचा डाव रचला. त्यांनी बँकेजवळच असलेल्या एका हार्डवेअर दुकानातून नवीन कुलूप खरेदी करून आणले आणि ते कुलूप बँकेच्या बाहेरील मुख्य दरवाजाला ठोकले. तब्बल दोन तास बँकेला कुलूप ठोकण्यात आल्याने बँकेत अधिकारी व कर्मचारी डांबून ठेवले गेले. दरेकर हे बँकेला कुलूप ठोकल्यानंतर चावी स्वतःजवळ ठेवून निघून गेले. त्यामुळे बँकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांना दोन तासापर्यंत बंद ठेवण्याबरोबरच शासकीय कामकाजात अडथळा आणला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.