सांगली : विक्रीसाठी तयार झालेल्या द्राक्ष बागेवर एका रात्रीत वटवाघळांच्या झुंडीने हल्ला करत बागेतील दहा टन द्राक्षे फस्त करण्याची घटना तासगाव तालुक्यातील हातनूर येथे घडली. या घटनेनंतर कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी बागेत जाऊन नुकसानीचा पंचनामा केला.

हातनूर येथे विठ्ठल पाटील यांची एक एकर सुपर सोनाका जातीची द्राक्षबाग आहेत. हंगामाच्या सुरुवातीला दर चांगला लाभेल या आशेवर त्यांनी आगाप फळछाटणी घेतली होती. आता माल तयार झाला असून येत्या चार दिवसांत मालाची विक्री करण्याची तयारी सुरू होती. यातच सोमवारी रात्री द्राक्ष बागेवर शेकडो वटवाघळांनी हल्ला चढवत एका रात्रीत बागेतील द्राक्षे फस्त केली. सुमारे आठ ते दहा टन माल निघेल अशी स्थिती होती. वटवाघळांनी बागेतील सर्व तयार माल फस्त केल्याने सुमारे आठ लाखांचे नुकसान झाले आहे.

Dance video Uncle aunty dance went viral on social media
काका काकूंचा नादच खुळा! भर कार्यक्रमात बॉलीवूड गाण्यावर दोघांनी धरला ठेका, VIDEO एकदा पाहाच
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं;…
wari hanuman temple
बुलढाणा : वारी हनुमान संस्थानवर दरोडा, पुजाऱ्याला बांधून लाखोंचा ऐवज लंपास…
thane police arrest
कल्याणमधील पत्रीपुलाजवळ प्रतिबंधित कोडीन औषधाच्या बाटल्या जप्त
Fire , Natasha Enclave Society, Kondhwa,
पुणे : कोंढव्यातील नताशा एनक्लेव्ह सोसायटीत आग, रहिवासी बाहेर पडल्याने बचावले
nashik nylon manja loksatta news
नाशिकमध्ये एक लाखाचा नायलाॅन मांजा जप्त
Massive fire breaks out in Kurla news in marathi
कुर्ल्यातील उपाहारगृहात भीषण आग
kalyan bar loksatta news
कल्याणमध्ये बारमधील गायिकेला मद्याची बाटली मारण्याचा प्रयत्न; बारमालकाला ग्राहकांची मारहाण, दोन जण अटकेत

हेही वाचा…Maharashtra CM Swearing Ceremony Live : आज मुंबईत शपथविधी, वाहतूक व्यवस्थेत बदल; कोंडीपासून वाचण्यासाठी कोणते रस्ते टाळाल? वाचा सविस्तर

u

वटवाघळांनी द्राक्ष बागेचे नुकसान केल्याची माहिती मिळताच तालुका कृषी अधिकारी अनिल फोंडे, मंडल कृषी अधिकारी बजरंग कोर्टे, पर्यवेक्षक कदम, तलाठी पतंग माने, मंडळ निरीक्षक नीलेश भांबोरे, ग्रामसेवक जालिंदर मोहिते आदींनी पाहणी केली. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य मोहन आण्णा पाटील, अजय पाटील, बंडू पाटील आदी उपस्थित होते. कृषी विभागाच्या पथकाने नुकसानीचा पंचनामा केला असून तसा अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येणार असल्याचे सांगितले.

Story img Loader