Vaishnavi Hagawane Dowry Harassment Case Updates : पिंपरी चिंचवड येथील वैष्णवी हगवणे आत्महत्येप्रकरणी बावधन पोलिसांनी आज पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तरे मिळण्याची शक्यता होती. परंतु, पोलिसांनी दोन मिनिटांत परिषद गुंंडाळल्याने पत्रकारांचे अनेक प्रश्न अनुत्तरीत राहिले. यावेळी त्यांनी राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांच्या अटकेविषयी माहिती दिली.

बावधन पोलीस म्हणाले, “बावधान पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या वैष्णवी हगवणे यांच्या कुटुंबातील तीनजण अटकेत होते, उर्वरित दोन आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठांच्या मार्गादर्शनसाठी सहा पथके तैनात करण्यात आली होती. पैकी राजेंद्र हागवणे (वैष्णवीचे सासरे) आणि सुशील हगवणे (वैष्णवीचा दीर) यांना आज पहाटे आमच्या पथकाने पुणे स्वारगेट येथून अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयासमोर पीसीआरसाठी हजर केले जाणार आहे.”

ते पुढे म्हणाले, “सर्व पुरावे संकलित करून घेतले जात असून हे पुरावे घेऊन योग्य कलमाखाली दोषारोप तयार केला जाईल. या संपूर्ण गुन्ह्याला लॉजिकल एन्डला दोषसिद्धी नेण्यास आम्ही कटिबद्ध आहोत. तशा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सूचना आलेल्या आहेत.” इतकं बोलून पोलीस अधिकारी जागेवरून उठून निघून गेले.

अटक झालेल्या आरोपींना २६ मेपर्यंत पोलीस कोठडी

दरम्यान, याप्रकरणी पुणे आणि पिंपरी चिंचवड पोलिसांनी जातीने लक्ष घातलं असल्याची माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनीही दिली. गेल्या आठवड्यात राजेंद्र हगवणे यांची सून वैष्णवी हगवणे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. त्या दिवसापासून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे हे फरार होते. पती शशांक, सासू लता आणि नणंद करिष्मा यांना आधीच पोलिसांनी अटक केलेली आहे. त्यांना २६ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काल दिवसभर राजकीय नेत्यांनी कस्पटे कुटुंबाची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केलं. लवकरात लवकर आरोपींना अटक करण्यात येईल अस आश्वासन दिलं होतं. पोलिसांची सहा पथक आरोपींचा शोध घेत होते. अखेर त्यांना स्वारगेटमधून बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. अजित पवार यांनी देखील फोन द्वारे कस्पटे कुटुंबीयांशी संवाद साधत त्यांना धीर दिला होता. आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल अस आश्वासन दिल होत.